Rohan Ujalambe murder case, Latur crime News Today | मित्रच झाला वैरी, खुन्नस ठेऊन मित्रानेच काढला रोहन उजंबळेचा काटा, हल्लेखोर मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात.
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Rohan Ujalambe murder case , Latur crime News Today | लातूर शहरातील विशाल नगर भागातील साई मंदिर परिसरात भरदुपारी राहुल उजंबळे या 19 वर्षीय विद्यार्थ्याचा खून करण्यात आला होता. रविवारी घडलेल्या या थरारक घटनेने लातुरमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातील मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
औसा तालुक्यातील लाेदगा येथील रहिवासी राेहन सुरेश उजळंबे ( रा. माेती नगर, लातूर) याचा रविवारी भरदिवसा काेत्याने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडली हाेती.पाेलिसांनी मंगळवारी सकाळी घटनेनंतर पसार झालेल्या मित्राला पुण्यावरुन लातुरात येणाऱ्या एका ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (Rohan Ujalambe Murder Case, Latur Crime News Today)
पाेलिसांनी सांगितले, राेहन उजळंबे हा इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत हाेता. दरम्यान, मित्र आणि त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले हाेते. याच भांडणाचा राग मनात ठेवत मित्रानेच त्याचा खून केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Rohan Ujalambe Murder Case, Latur Crime News Today)
आपले भांडण मिटले असून, आपण दाेघे मित्र आहाेत, असा विश्वास राेहन उजळंब याला मित्राने दिला हाेता. राेहनने आपल्या मित्राच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला आणि मनातील राग काढून टाकला.
काही दिवसांपासून मारेकरी मित्र राेहनसाेबत गाेडीगुलाबीने राहत हाेता.
राेहनलाही वाटले आपला झालेला वाद हा तात्कालीक हाेता. मात्र, मारेकरी मित्राच्या मनात भांडणाची खुन्नस कायम हाेती. याच रागातून राेहनचा खून करण्याचा विचार त्यांच्या मनात घाेळत हाेता. शेवटी रविवारी सकाळी भेटायचे आहे असे सांगून राेहनला घराबाहेर बाेलावून घेतले.घटनेपूर्वी ते लातुरात विविध ठिकाणी माेटारसायकवरुन फिरत हाेते. (Rohan Ujalambe Murder Case, Latur Crime News Today)
- भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
- Ajinkya Ram Shinde : अजिंक्य राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास चोंडीत लोटला हजारोंचा जनसागर
- Karjat Jamkhed News: हळगाव साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यावर मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नान्नजमधील सजग नागरिकांनी केला रोहित पवारांच्या धनशक्तीचा भांडाफोड !
- आमदार प्रा राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी उद्योजक लालासाहेब उबाळे यांच्याकडून 1 लाख रूपयांची आर्थिक मदत
- Karjat Jamkhed News : आमदार राम शिंदेंनी गाजवले कर्जतचे मैदान, सांगता सभेत शरद पवार व रोहित पवारांचा जोरदार समाचार, वाचा राम शिंदेंच्या भाषणातील सर्व मुद्दे
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दाेघेही विशाल नगरातील साई मंदिर चाैकात आले.यावेळी सहज बाेलत-बाेलतच साेबत आणलेल्या धारदार काेयत्याने फिल्मीस्टाईने राेहनच्या गळ्यावर, डाेक्यात आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हल्ल्यात राेहन गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर काेसळला. दरम्यान, शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. (Rohan Ujalambe Murder Case, Latur Crime News Today)
याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. अखेर तिसऱ्या दिवशी पाेलिसांनी खूनप्रकरणातील आराेपी मित्राला ताब्यात घेतले आहे. शाळेच्या दाखल्यावरुन त्याचे वय समाेर येणार आहे.
घटनेनंतर मारेकरी मित्राने लातूर जिल्ह्याची हद्द ओलांडली. ताे साेलापूर, पुणे आणि इतर ठिकाणी पाेलिसांना गुंगारा देत भटकत राहिला. साेबतचा माेबाईलही मारेकऱ्याने स्विचऑफ केल्याचे पाेलिसांना आढळून आले. पाेलिसांची चार पथके मारेकऱ्याच्या मागावर हाेती. ताे पुण्यातून लातूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे त्याला मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले अशी माहिती पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली. (Rohan Ujalambe Murder Case, Latur Crime News Today)