Vaijapur Ladgaon murder case | प्रेमविवाहाची भयंकर शिक्षा : आईच्या मदतीने भाऊच बनला बहिणीचा वैरी,गळा चिरत शीर केले धडावेगळे; पुरोगामी महाराष्ट्र हादरला !
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घटनेने समाजमन हादरून गेले
वैजापुर औरंगाबाद : Vaijapur Ladgaon murder case । पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेत प्रेम विवाह (love marriage) करणाऱ्या मुलीची तिच्याच आई आणि भावाने धारधार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली आहे (Aurangabad Honor Killing) आई आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश थोरे आणि नागिणापिंपळगाव येथील किर्ती ऊर्फ किशोरी मोटे या दोघांनी 21 जून 2021 रोजी पुण्यातील आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. या विवाहाला कीर्तीच्या कुटूंबाचा प्रचंड विरोध होता.
लग्नानंतर काही दिवसांनी अविनाश आणि किर्ती हे दोघे लाडगावला परतले होते. दोघे एका शेतात राहत होते. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होईल असे दोघांना वाटत होते. पण नियतीच्या मनात वेगळचं होतं. किर्ती ही तिच्या सासरी राहायला आली आहे ही बाब तिचा भाऊ व आई शोभा मोटे यांना समजताच दोघे तिला भेटायला गेले.
आई आणि भाऊ आपल्याला भेटायला आलेत हे पाहून किर्ती प्रचंड आनंदून गेली होती. तिने आई व भावाला पाणी पाहताच क्षणी त्यांना पाणी दिले. त्यानंतर ती चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली. चहा बनवत असतानाच तिच्या पाठोपाठ तीचा भाऊ आणि आई किचनमध्ये गेले.
तु पळून जाऊन प्रेम विवाह का केलास ? असा प्रश्न दोघांनी किर्तीला केला. यावेळी तिघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळेस कीर्तीच्या आईने तिला पाठीमागून घट्ट पकडले आणि तिच्या क्रूर भावाने कोयत्याने तिचा गळा चिरला. अत्यंत क्रूरपणे तिच्या आई आणि भावाने कीर्तीचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर आरोपी भाऊ कीर्तीचे मुंडके घेऊन घराबाहेर आला. थरकाप उडवणारा हा प्रसंग अनेकांनी पाहिला.
धडावेगळे केलेलं बहिणीचं शीर घेऊन आरोपी भाऊ घराबाहेर आणि घराबाहेर असलेल्या लोकांना शीर दाखवत म्हणाला ‘बघा हिचं काय केलं पहा’ त्या आधी आरोपी भाऊ कीर्तीच्या नवर्याला मारण्यासाठी त्याच्या खोलीत गेला होता. मात्र त्याआधीच तो किर्तीचा आवाज ऐकून पळून गेला होता. किर्ती चा नवरा आजारी असल्याने झोपून होता अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान घटनेनंतर मयत किर्तीचा भाऊ आणि आई दोघांनी पोलिस स्टेशन गाठत खुनाची कबुली दिली. ही घटना रविवारी घडली. सैराटपेक्षाही क्रूर घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आल्याने महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील या धक्कादायक घटनेने समाजमन हादरून गेलं आहे.याप्रकरणात कीर्तीच्या मारेकरी असलेल्या आई व भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.तर भावाची रवानगी बाल रिमांड होममध्ये करण्यात आली आहे.