Chandrayaan 3 Video : चांद्रयान-3 ने पाठवली चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे, इस्त्रोने जारी केला व्हिडीओ, चांद्रयान-3 च्या कॅमेर्यातून कसा दिसतोय चंद्र ? पटकन पहा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारताच्या चांद्रयान – 3 मोहिमेची संपुर्ण जगाला उत्सुकता लागलेली आहे. चांद्रयान येत्या 23, 24 किंवा 25 ऑगस्ट 2023 ला चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान – 3 सध्या चंद्राच्या कक्षेत स्थिरावले आहे. चांद्रयान – 3 ने चंद्राच्या पृष्ठभागाची काही मनमोहक छायाचित्र टिपले आहेत. चांद्रयान – 3 ने पाठवलेल्या छायाचित्राचा व्हिडीओ इस्त्रोने रविवारी रात्री जारी केला आहे. (chandrayaan 3 video)
भारताने आपल्या तिसऱ्या चांद्र मोहिमेला 14 जूलै रोजी प्रारंभ केला. 14 जूलै ते 5 ऑगस्ट या 22 दिवसाच्या प्रवासात इस्त्रोने आखलेल्या मोहिमेनुसारच चांद्रयान-3 चा यशस्वी प्रवास सुरू आहे. भारताच्या या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान – 3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश करत महत्वाची कामगिरी बजावली आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच चांद्रयान 3 ने पहिली जबरदस्त कामगिरी बजावली आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र त्याने टिपले असून ते पृथ्वीवर पाठवले आहे.
चांद्रयान 3 ने पृथ्वी ते चंद्रादरम्याने 2 तृतीयांश अंतर पार केले आहे. सध्या चांद्रयान चंद्राच्या कक्षेत स्थिरावले आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राचा अनुभव चांद्रयान 3 घेत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. चंद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र इस्त्रोला पाठवले आहे. इस्त्रोने हे छायाचित्र व्हिडीओ द्वारे सार्वजनिक केले आहे.
chandrayaan 3 video : इस्त्रोने जारी केलेला व्हिडीओ खाली पहा
आज रविवारी रात्री अकरा वाजता चांद्रयान 3 च्या कक्षा कमी करण्याचे प्रचालन करण्यात आले. चांद्रयान सध्या चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमी कक्षेत आहे. 9 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा कक्षा बदलली जाणार आहे. चांद्रयान चंद्राभोवतीची प्रदक्षिणा पुर्ण करत चंद्राच्या जवळ जाऊन 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडींग करण्याचा पहिला प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा देश ठरणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारा भारत ठरणार जगातला पहिला देश ?
भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारा जगातला पहिला देश ठरणार आहे. चंद्राच्या दक्षिण पोलवर आतापर्यंत कोणत्याच देशाने लॅंडींग करण्याचे धाडस दाखविलेले नाही. कारण हा भाग नेहमीच काळोखात असून येथील तापमान अतिशीत आहे. विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे.