UPSC success 2020 | UPSC च्या निकालात विनायक नरवडे राज्यात दुसरा ! वाचा कुणी कुणी मारली बाजी
महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले
दिल्ली , वृत्तसंस्था : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक नरवाडे दूस-या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे 36 आणि 37 व्या स्थानावर आहेत. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37) रजत रविंद्र उभयकर (49) जयंत नाहाटा (56), धीनह दस्तरगीर विनायक महामुनी (95) या महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.
UPSC च्या निकालात अहमदनगर जिल्ह्यातील अभिषेक दुधाळ (469 रँक), विनायक नरवदे ( रँक 037 ), विकास पालवे (587 रँक) या तिघांनी घवघवीत यश संपादन केले. UPSC निकालात प्रथमच अहमदनगर जिल्ह्याने मोठी बाजी मारली आहे. जिल्ह्यात तीनही यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान पूजा कदम या अंध विद्यार्थीनीने अंधत्वावर मात करत युपीएससीत घवघवीत यश मिळवले आहे. तसेच लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात 199 वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
महाराष्ट्रातील उत्तीर्ण उमेदवार खालीलप्रमाणे
लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134),कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभिषेक खंडेलवाल (167),गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), (182), प्रतिक अशोक धुमाळ (183), आषिश गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222),तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजशिरके (237),साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266) मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे (३१२) , आकाश चौधरी (३२२), आनंद पाटील (३२५), सचिन चौबे (३३४), श्रीकांत विसपुते (३३५), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (३३८), सुहास गाडे (३५०), सागर मिसाळ (३५३), सुरज गुंजाळ (५५४), अनिल म्हस्के (३६१), अर्पिता ठुबे (३८३), सागर वाडी (३८५), आदित्य जिवने (३९९), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (४२२), अनिकेत फडतरे (४२६), श्रीराज वाणी (४३०), राकेश आकोलकर (४३२), वैभव बांगर (४४२), शुभम जाधव (४४५), अमर राऊत (४४९), शुभम नागरगोजे (४५३), ओंकार पवार (४५५), अभिषेक दुधाळ (४६९), प्रणव ठाकरे (४७६), श्रीकांत मोडक (४९९), यशवंत मुंडे (५०२), अनुजा मुसळे (५११), बानकेश पवार (५१६), अनिकेत कुलकर्णी (५१७), अश्विन राठोड (५२०),अर्जित महाजन (५२१), शुभम स्वामी (५२३), श्रीकांत कुलकर्णी (५२५), शरण कांबळे (५४२), स्नेहल ढोके (५६४), सचिन लांडे (५६६), स्वप्निल चौधरी (५७२), अभिषेक गोस्वामी (५७४), अनिल कोटे (५८४), विकास पालवे (५८७), विशाल सारस्वत (५९२),मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (६१४), अजिंक्य विद्यागर (६१७),निलेश गायकवाड (६२९), हेताळ पगारे (६३०), रविराज वडक (६३३), कुणाल श्रोते (६४०), सायली गायकवाड (६४१) ,सुलेखा जगरवार (६४६) ,सुबोध मानकर (६४८) ,शिवहार मोरे (६४९) ,सुब्रह्मण्य केळकर (६५३) , सुमितकुमार धोत्रे (६६०), किरण चव्हाण (६८०), सुदर्शन सोनवणे (६९१),विनीत बनसोड (६९२), श्लोक वाईकर (६९९), अजय डोके (७०५), देवव्रत मेश्राम (७१३), स्वप्निल निसर्गन (७१४), शुभम भैसारे (७२७), पियुष मडके (७३२), शितल भगत (७४३), स्वरूप दीक्षित (७४९)
UPSC च्या निकालामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 अश्या उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302, ब गटातील प्रशासकीय सेवा 118 असणार आहेत.
अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
web tital : More than 100 candidates from Maharashtra achieved UPSC success