खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या भूमिकेत, राज्यात नव्या वादाला तोंड फुटले,मंत्री अव्हाडांचा अमोल कोल्हेंवर संताप, सोशल मिडीयावर कोल्हेंविरोधात टीकेचा सूर तापला
मुंबई | व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा टिझर आज प्रसिध्द झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. टिझर पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याचे दिसत आहे. यावरून डाॅ अमोल कोल्हे सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल होऊ लागले आहेत. (MP Amol Kolhe in the role of Nathuram Godse, new controversy erupted in the state, Minister Avhad’s anger on Amol Kolhe, criticism against Kolhe on social media)
देशाच्या सर्वांगिण विकासात महात्मा गांधीचं योगदान देश कधीच विसरू शकत नाही. स्वातंत्र्य संग्रामात आपल्या अहिंसावादी तत्वांनी महात्मा गांधींनी स्वातंत्रलढा अजरामर केला आहे.
महात्मा गांधीसोबतच्या वैचारिक वादातून नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची हत्या केली होती. या घटनेनं देशासह जगाला स्तब्ध केलं होतं. आजही या वाईट घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या की देशात वाद उद्धवतो.
नथुराम गोडसेची बाजू घेऊन उघडपणे महात्मा गांधीच्या हत्येचं समर्थन करणारे अनेकजण देशात आणि राज्यात पहायला मिळतात. महात्मा गांधीना नथुरामनं का मारलं? हा प्रश्न सर्वांच्या मनात एक घर करून आहे.
महात्मा गांधीच्या हत्येनंतर देशभरातून गोडसेवर अनेक कलाकृती बनवण्यात आल्या. आता व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर मात्र आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
- Maharashtra Women Minister Portfolio : महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर
- Krushi Mantri Maharashtra 2024 : माणिकराव कोकाटे बनले महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री !
- Big News : महायुती सरकारकडून प्रशासनात मोठी खांदेपालट, महाराष्ट्रातील २३ बड्या सनदी अधिकार्यांच्या बदल्या !
- Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
- Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी
आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकारणात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या नथुरामच्या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. नथुरामची भूमिका साकारल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा वाद उभा राहिला आहे. सर्वस्तरातून अमोल कोल्हेंवर टीका करण्यात येत आहे. हा चित्रपट 20 तारखेला प्रदर्शित होणार आहे.
नथुराम गोडसेला गांधींना मारल्याप्रकरणी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर देशात आजही नथुरामच्या विचारांना मानणारे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. अशात आता हा चित्रपट मोठ्या वादाला कारणीभूत ठरू शकतो. नथुराम गोडसे चित्रपटात एक अभिनेता म्हणून काम केल्यानं कोल्हे अडचणीत सापडले आहेत. प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदार अमोल कोल्हेंचा जोरदार समाचार घेतला आहे. अव्हाड म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. विनय आपटे – शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार अशी सडेतोड भूमिका घेतली आहे.
प्रतिक पाटील या ट्विटर युजरने अमोल कोल्हेंच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी होता हेच कायम सत्य राहणार आहे.जो कुणी गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तो या देशाशी प्रतारणा करतो आहे अशी टीका पाटील यांनी केली आहे.
भैय्या पाटील या युजर्सनेही डाॅ अमोल कोल्हे यांना चांगलेच फटकारले आहे. पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, अमोल कोल्हे तुम्ही एवढी एक ओळीची पोस्ट न चुकता 30 जानेवारी पर्यंत लिहा – स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हत्यारा नथुराम गोडसे मुर्दाबाद..तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचे स्वतःला म्हणावता तर हे म्हणायला काहीच हरकत नाही. जर वरची लाईन म्हणू नाही शकला तर तुम्ही धंदेवाईकच अशी जहरी टीका पाटील यांनी केली आहे.
नथुराम गोडसेच्या भूमिकेत अमोल कोल्हे पहा व्हिडीओ