जामखेड टाईम्स वृत्तसेवा : MPSC Exam 2019 Results | सन 2019 साली घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Result) राज्यसेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीमुळे निकाल जाहीर करण्यात आला नव्हता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार, नायब तहसिलदार,अशी वेगवेगळी 26 पदांसाठी 2019 मध्ये परिक्षा घेतली होती. आज जाहिर झालेल्या निकालात 420 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
MPSC परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाची प्रतिक्षा होती. अखेर MPSC ने या उमेदवारांना मोठा दिलासा देत निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 13 ते 15 जुलै 2019 या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली होती.
परंतु कोरोना महामारी व मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर निकाल घोषित करण्यात आला नव्हता.निकाल घोषित व्हावा यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर सातत्याने मागणी केली जात होती. सरकारवर दबाव वाढवला जात होता. अखेर यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला. शासन निर्णयानंतर निकाल घोषित करण्यात आला आहे.
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे खुल्या प्रवर्गात रुपांतरीत करण्यात आली आहेत.
MPSC ने सर्व प्रवर्गासाठी हा निकाल जाहीर केला आहे. आज जाहीर झालेल्या निकालात प्रसाद चौगुले याने खुल्या प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला. तर रोहन कुंवर याने मागास वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच महिला प्रवर्गातून मानसी पाटील प्रथम आली आहे.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019- लिपिक टंकलेखक परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/MqtiKQRKMZ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021
web titel : MPSC Exam 2019 Results | MPSC Exam 2019 Results Announced