जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुध दरवाढ जाहीर केली. तसा शासन आदेश जाहीर केला. परंतू या शासन निर्णयात सुस्पष्टता नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांना तोटा होऊ लागला आहे. यामुळे भाजपा नेते आमदार प्रा राम शिंदे हे दुध उत्पादकांच्याच्या प्रश्नावरून विधानपरिषदेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी दुध उत्पादकांच्या ज्वलंत प्रश्नांवर विधानपरिषदेत आवाज उठवला. यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, कांद्याचे भाव पडत असताना कांदा उत्पादक अडचणी सापडू नये यासाठी सरकारने मदत करण्याची भूमिका घेतली होती. तसाच निर्णय दुध उत्पादकांसाठी सरकारने घेतला. परंतू या निर्णयात त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत माझ्याकडे कर्जत तालुका दुध संघांने निवेदन दिले आहे. शासनाने गायीच्या दुधासाठी 3.5/8.5 गुणप्रतिस 34 रूपये दर जाहीर केलाय. परंतू सरकारने ही घोषणा जरी केली असली तरी, अंमलबजावणी केली असली तरी काही दुध संघ आणि खाजगी संस्था शासन निर्णयात सुस्पष्टता नसल्यामुळे गैरफायदा घेत आहेत. यामुळे दुध शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे.
शिंदे पुढे म्हणाले, शासन निर्णयामुळे कधी नव्हे ते SNF वर भाव जात आहे. कोणत्याही संस्थेचा SNF 8.3 च्या पुढे जात नाही. प्रति पाँईट एक रूपया कमी करण्याचे ठरविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पुर्वी जो दर मिळायचा त्याहून कमी दर शासनाच्या नव्या निर्णयामुळे मिळत आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 260 अन्वये चर्चा करत असताना राज्यातील दुध उत्पादकांचे लक्ष सरकारकडे लागले आहे. सरकारने दुध उत्पादकांना दिलासा द्यावा. दुध दरवाढीसाठी जो शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय त्याची निटनाटकी चिकित्सा करून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासंदर्भात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुस्पष्टता नसल्यामुळे दुध उत्पादकांना 34 रूपये दर मिळण्याऐवजी कमी दर मिळतोय, पुर्वी जो दर मिळायचा त्याहून कमी दर मिळतोय, सध्याचा 34 रूपये दर मिळण्याऐवजी 32 रूपये, 31 रूपये, 29 रूपये, 27 रूपये असा कमी दर मिळतोय. त्यामुळे शासन निर्णयात दुरूस्ती केली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना केली.
“राज्य सरकारने दुध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 34 रूपये दुधाचे भाव जाहीर केले होते. त्यासाठी सरकारने शासन निर्णय काढला. परंतू त्यात सुस्पष्टता नसल्याने काही दूध संघ व खाजगी दुध संस्थांनी पळवाट काढली. यामुळे राज्यातील लाखो दुध उत्पादक शेतकरी अडचणी आले. ही बाब माझ्या निदर्शनास येताच 260 अन्वये मी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. शासन निर्णयात दुरूस्ती करण्याची मागणी केली. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन सभागृहात दिले. यामुळे राज्यातील दुध उत्पादकांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
“सरकारने दुध दरवाढीबाबत जारी केलेल्या शासन निर्णयात दुरुस्ती व्हावी अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी केली. या मागणीवर बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन सभागृहात दिले. यामुळे राज्यातील लाखो दुध उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”