Bullibai app case । बुल्लीबाई ॲप प्रकरणात तीन जण अटकेत,मुंबई पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे पुरावे, हेमंत नगराळेंचा खुलासा
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 6 जानेवारी । जगात गाजत असलेल्या बुलीबाई ॲप (BulliBai App Case) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अत्तापर्यंत तीन जणांना अटक (Three arrested) केली आहे. यात दोन तरूण आणि एका तरुणीचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे तिघेही 21 वर्षाच्या आतील आहेत. याबाबतची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून दिली आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून देशात खळबळ उडवून देणाऱ्या बुल्लीबाई ॲप (BulliBai App Case) प्रकरणातील सूत्रधारांना शोधण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले. या प्रकरणात बंगळूर येथून विशाल झा, उत्तराखंड येथून श्वेता सिंग ( वय 18) आणि मयंक रावत या तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील कुमार विशाल झा याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Vishal Jha, shweta Singh, Mayank Rawat )
देशभरातील मुस्लिम समाजातील प्रसिध्द महिलांच्या फोटोंशी छेडछाड (मार्फ) करून बुल्लीबाई ॲप आणि सुल्ली डील या ॲपवर फोटो टाकून त्यांची ऑनलाईन बोली लावली जात होती. मागील वर्षी सुल्ली डीलचे (Sulli deals Case) प्रकरण उजेडात आले होते. यासंबंधी दिल्लीत गुन्हाही दाखल झाला होता परंतू या प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना (Delhi Police) यश आले नव्हते.
त्यातच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुल्लीबाई ॲप प्रकरण उजेडात आले. बुल्लीबाई ॲप प्रकरणात देशातील मुस्लिम महिला पत्रकार व अन्य प्रसिध्द महिलांचे (Muslim women, Muslim journalists, famous Muslim womens) फोटो टाकण्यात आल्याचे व त्या फोटोंशी छेडछाड करून बोली लावण्यात आल्याचे उघडकीस आल्याने देशात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणावरून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Shiv Sena MP Priyanka Chaturvedi) यांनी मुंबईत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान बुल्लीबाई प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणात ज्या महिलांची बदनामी करण्यात आली होती त्यातील अनेक देशाच्या वेगवेगळ्या भागात गुन्हे दाखल केले आहेत.
याशिवाय यातील काही महिला उघडपणे सोशल मिडीया असो अथवा टिव्हीवर येऊन या प्रकरणाविरोधात आवाज उठवत असल्याचे गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसत आहे. भारतात उघड झालेल्या बुल्लीबाई ॲप प्रकरणाची जागतिक मिडीयानेही गंभीर दखल घेतली आहे. भारतात महिला सुरक्षित नसल्याचा मुद्दा जागतिक मिडीयाने उचलून धरला आहे. जगभर बुल्लीबाई ॲप प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. (The Bullibai case was noticed by the world media)
दरम्यान बुल्लीबाई ॲप प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी अतिशय वेगाने तपास करत तिघांना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली. या प्रकरणाचा तपास करताना आरोपींची मोडस ऑपरेंडी (Modus operandi) काय होती यावर बोलताना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, बुल्लीबाई ॲप या सोशल मिडीया ॲपवर (Social Media) एका विशिष्ट समाजातील काही महिलांचे फोटो मार्फ करत त्यांची बोली लावली जात होती. त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेजेस सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. यात काही मुस्लिम महिला, सामाजिक कार्यकर्त्या, महिला पत्रकारांचाही समावेश होता.
या प्रकरणी काही महिलांनी पुढे येत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या ॲप आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी हे प्रकरण पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. 31 तारखेला हे अॅप लोड केल्यानंतर ऍप, आणि ज्या ट्वीटर हॅन्डलवरुन या ऍपची माहिती दिली जात होती. धक्कादायक म्हणजे ही वेबसाईट (website) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या नावानं ट्विटर हॅन्डलही (Twitter handle) सुरु करण्यात आलं होतं.
या ट्विटर हॅन्डलचे फॉलोअर्सची माहिती काढून त्यांच्याकडून तपास केला असता त्यातून अधिक धागेदोरे हाती लागत गेले. या प्रकरणात अटक केलेल्या तिघांपैकी दोघांना मुंबईतही आणण्यात आलं आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींपैकी विशाल झा हा इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याची चौकशी केली जात आहे. श्वेता सिंह ही तरुणी या प्रकरणी संशियत आरोपी असून तिच्यासह मयंक रावत नावाच्या तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
हे वादग्रस्त ॲप एका मोठ्या कटाचा भाग असू शकतो, असा संशयही मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास सुरु असून पोलिसांचं सायबर पथक याप्रकरणाचा तपास करत आहे. या वादग्रस्त ॲपच्या माध्यमातून महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याने आरोपींवरकठोर कारवाई केली जाणार असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. त्याच बरोबर, अशा प्रकारच्या संवेदनशील घटना पुन्हा होऊ नये, यासाठीही सतर्कता बाळगण्याची आणि काळजी घेण्याचे आवाहन हेमंत नगराळे यांनी केलं आहे.
बुली बाई ॲप आणि ट्विटर हॅन्डल ऑपरेटींग प्रकरणी काही इमेलही पोलिसांच्या हाती लागले असून त्यांचाही तपास केला जात आहे. त्याचबरोबर ज्यांना Appबाबत अधिक माहिती द्यायची असेल, किंवा तक्रार करायची असेल त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाशी संपर्क करावा, असंही आवाहन हेमंत नगराळे ( Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांनी केलं आहे.