Mumbai Underground Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मेट्रो ३ च्या पहिल्‍या टप्प्याचे लोकार्पण । Aarey JVLR to BKC Metro 3

Mumbai Underground Metro Colaba-Bandre-Seepz Mumbai Metro Line 3:  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन ३, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ (Aarey JVLR to BKC Metro 3) या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शनिवारी लोकार्पण करण्यात आले.(mumbai underground metro news in marathi)

Mumbai Underground Metro Colaba-Bandre-Seepz Mumbai Metro Line 3, Prime Minister Narendra Modi inaugurated first phase of Aarey JVLR to BKC Metro 3, Mumbai metro latest news today,

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या वाहतुकीला गती देणाऱ्या मेट्रो ३ च्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाले.तसेच मुंबई व ठाणे परिसरातील ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री मोदी यांनी बांद्रा-कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशन येथे पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी बीकेसी ते सांताक्रुज असा मेट्रो प्रवास केला. प्रधानमंत्री मोदी यांनी प्रवासादरम्यान मेट्रोमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी भगिनी आणि विद्यार्थी, मजूर यांच्याशी संवाद साधला.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट- ३ या मेट्रो सेवेच्या ‘मोबाइल ॲप’चे ही लोकार्पण करण्यात आले. हे ॲप नवीन वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त असणार आहे. याचबरोबर मेट्रो ३ प्रकल्पावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरणही प्रधानमंत्री मोदी यांच्या  हस्ते करण्यात आले. यामध्ये भूमिगत मेट्रो प्रवासाच्या नेत्रदीपक फोटोंचा संग्रह आहे. मेट्रो ३ (आरे- बिकेसी) हा मार्ग रविवार दि.५ऑक्टोबर २०२४ रोजीपासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

मुंबई मेट्रो लाईन ३ च्या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्ये

  • कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन ३
  • मेट्रो लाईन ३ चा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला- कॉम्लेक्स
  • एकुण लांबी – १२.६९ किलोमीटर.
  • एकूण स्थानके १० – ९ भूमिगत व एक जमीन स्तरावर
  • प्रकल्प खर्च (टप्पा-१)-  ₹१४१२० कोटी