Nagpur Sucied Case : महाराष्ट्र हादरला, नरखेडच्या मोवाड येथील एकाच कुटुंबातील चौघांची सामुहिक आत्महत्या, आत्महत्या की घातपात ? पोलिस तपास सुरु
Nagpur Sucied Case : विदर्भातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी सामुहिक आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेत पती – पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपुर जिल्ह्यातील मोवाड ता नरखेड गावात घडली आहे. सामुहिक आत्महत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील.एका कुटुंबातील चौघा जणांनी गळफास लावून घेत सामुहिक आत्महत्या केली. या घटनेत शिक्षक असलेले विजय मधुकर पाचोरी (वय ६२) पत्नी माला विजय पाचोरी ( वय ५४), मुलगा डिंकु विजय पाचारी (वय ४०) व लहान मुलगा गणेश विजय पाचोरी (वय ३७ ) अश्या चौघा जणांनी राहत्या घरी गळफास लावून घेत सामुहिक आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली.
मोवाड येथील वार्ड क्रमांक ५ मधील खोब्रागडे यांच्या येथे पाचोरी कुटूंब भाड्याने राहत होते. या कुटूंबाने सामुहिक आत्महत्या केल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या कुटुबांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिस या घटनेचा वेगाने तपास करत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी आढळून आलेल्या चारही मृतदेहापैकी तिघा मृतदेहांचे हात पाठीमागून बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ही सामुहिक आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा वेगाने तपास सुरु केला आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथे आर्थिक घोटाळ्यातील आरोपी होता आणि काही दिवसांपूर्वीच तो जमीनावर बाहेर आला होता, अशी माहिती आहे. तसेच कुटुंबात आर्थिक तंगीमुळे वाद वाढला असावा, वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच घरातील सर्वांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि नंतर स्वतः गळफास घेतला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.