जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड हा मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेला अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे.जामखेड तालुक्यात एकुण 87 गावे आहेत. जामखेडचा पिनकोड 413201 हा आहे. (Jamkhed Taluka Pin code 413201) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे गाव जामखेड तालुक्यात सीना नदी काठावर वसलेले आहे.चोंडी हे राज्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला हा सुध्दा जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आहे. खर्डा परिसर सुध्दा महत्वाचे पर्यटन केंद्र आहे.
देवदैठण येथे पुरातन खंडोबा मंदिर, जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिर, धाकटी पंढरी म्हणून धगेगावला ओळखले, पाच ऋषींचं पांढरं म्हणून जवळा गावची ओळख आहे, जवळा आणि नान्नज येथील रथयात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. जामखेड तालुक्यातील पहिला साखर कारखाना व पहिले शासकीय कृषि महाविद्यालय हळगाव या गावात आहे. आणखेरी देवी मंदिर विचंरणा नदीच्या काठावर असून ते फक्राबाद- धानोरा गावच्या सरहद्दीवर आहे. यासह अनेक महत्वाचे ठिकाणं जामखेड तालुक्यात आहेत.
जामखेड तालुक्यातील गावे खालीलप्रमाणे
जामखेड, साकत, लेहनेवाडी, कडभनवाडी, कोल्हेवाडी, भुतवडा, सावरगाव, धोत्री, मोहा, रेडेवाडी, जमदारवाडी, सारोळा, चुंबळी, खुरदैठण , पाडळी, आपटी, घोडेगाव, पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा, सोनेगाव, धनेगाव, तरडगाव, दौंडाचीवाडी, वंजारवाडी, राजुरी, काटेवाडी, जवळके, नान्नज, चोभेवाडी, पोतेवाडी, महारूळी, वाघा, जवळा, मुंजेवाडी, बोर्ले, गोयकरवाडी, हळगाव, खरातवाडी, मतेवाडी, आघी, चोंडी, पिंपरखेड, हसनाबाद, कवडगाव,
गिरवली, अरणगाव, पारेवाडी, डोणगाव, फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, पाटोदा (गरडाचे), भवरवाडी, रत्नापुर, कुसडगाव, भोगलवाडी, डिसलेवाडी, खांडवी, बावी, झिक्री, सरदवाडी, राजुरी, शिऊर, फाळकेवाडी, नायगांव, नाहूली, लोणी, वाकी, आनंदवाडी, दरडवाडी, खर्डा, सातेफळ, धामणगाव, तेलंगशी, जायभायवाडी, मोहरी, जातेगाव, दिघोळ, माळेवाडी, देवदैठण, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, राजेवाडी, धोंडपारगाव, सतेवाडी, या गावांचा जामखेड तालुक्यात समावेश आहे.