कर्जत: मिरजगावमध्ये नाशिक – सोलापूर एसटी बस जळून खाक, जुन्या नगर – सोलापूर महामार्गावर रंगला ‘द बर्निंग बस’ चा थरार, काळ आला होता पण वेळ आली नव्हती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एस टी बस जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी घटना घडली. चालक व वाहकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने 20 प्रवाश्यांचे प्राण वाचले. भर चौकात एसटी बसने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने मिरजगावमध्ये काही काळ नागरिकांची मोठी पळापळ झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Nashik Solapur ST bus burnt down at Mirajgaon due to technical fault, thrill of The Burning Bus raged on old Nagar - Solapur highway, karjat jamkhed news today,

याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे जुन्या नगर सोलापूर महामार्गावरील क्रांती चौकात (दक्षिणमुखी मारूती मंदिराजवळ) नाशिकहून सोलापूरकडे जात असलेल्या नाशिक – सोलापूर (बस क्रमांक एम एच १४ बी.टी ४९५२) या एस टी बसमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड झाला. यावेळी बसमधून धुर निघाला. बस चालकाच्या कॅबीनमध्ये अचानक आगीने पेट घेतला. या बसमध्ये सुमारे १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते.

Nashik Solapur ST bus burnt down at Mirajgaon due to technical fault, thrill of The Burning Bus raged on old Nagar - Solapur highway, karjat jamkhed news today,

एसटी बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालक एस एस टोपणधारे व वाहक सांगवे यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी खाली उतरवले. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून बसचे मोठे नुकसान झाले आहे.

एसटी बस नाशिक येथून शुक्रवारी सकाळी ६ वाजता सोलापूरच्या दिशेने निघाली होती. अ.नगर येथून मिरजगाव बसस्थानकात बस आली असता, बस सुस्थितीत होती. मात्र बसस्थानकापासून ही बस निघाल्यानंतर अवघे काही मीटर अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे बसने अचानक पेट घेतला.

Nashik Solapur ST bus burnt down at Mirajgaon due to technical fault, thrill of The Burning Bus raged on old Nagar - Solapur highway, karjat jamkhed news today,

बसला अचानक आग लागल्याने वेळीच बसमधून प्रवाशी बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे प्रवाशांना काळ आला होता, पण वेळ नाही या म्हणीचा प्रत्यय आला.
मात्र, एसटी बस जळून खाक झाली.

मिरजगाव शहराच्या मध्यवर्ती रहदारीच्या चौकात ही घटना घडल्याने भीषण पेटलेल्या बसने आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरला होता.

Nashik Solapur ST bus burnt down at Mirajgaon due to technical fault, thrill of The Burning Bus raged on old Nagar - Solapur highway, karjat jamkhed news today,

बस पेटल्याने परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने काही वेळ बंद ठेवून बाजूला गेले होते. नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेमुळे जुन्या महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक बराच वेळ ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

एसटी बसमधील काही प्रवाशांच्या जवळ साहित्य असलेल्या बॅगी व पिशव्या जळून खाक झाल्या. एसटी बस पेटल्याने कर्जत येथे असलेल्या अग्नीशामक वाहन बोलावण्यासाठी अनेक नागरिकांनी संपर्क केला. कर्जत येथून अग्निशामक वाहन आले. आग विझवली खरी, मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून कोळसा झाली आणि बसचा सांगाडाच त्या ठिकाणी राहिला होता.

Nashik Solapur ST bus burnt down at Mirajgaon due to technical fault, thrill of The Burning Bus raged on old Nagar - Solapur highway, karjat jamkhed news today,

द बर्निंग बसची घटना पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी परिवहन महामंडळाचे अधिकारी विभागीय यांत्रिकी अभियंता कासार, विभागीय वाहतूक अधिकारी आर.डी मगर, जामखेडचे आगार व्यवस्थापक जगताप, मिरजगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक निरंजन काळे आदी आले होते.