national investigation agency mumbai | अंबानीच्या घरासमोर स्फोटकांची गाडी का ठेवण्यात आली ? सचिन वाझेने सांगितले धक्कादायक कारण
NIA ने कोर्टात दाखल केलं दहा हजार पानांचं चार्जशीट
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवण्यात आली होती ? या प्रश्नाचे कारण आता समोर आले आहे. national investigation agency mumbai ने आपल्या तपासात या कारणाचा शोध लावला आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin vaze) याने यासंबंधीची महत्वाची माहिती ANI ला दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर (Mukesh Ambani’s Antilia residence) 24 फेब्रुवारी 2020 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती. ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन याची होती. अंबानी स्फोटकंप्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren) यामध्ये सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (national investigation agency mumbai ) अर्थात NIAने कोर्टात दहा हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. (national investigation agency mumbai (NIA) has filed a chargesheet against sachin waze)
यामध्ये मुकेश अंबानी यांच्या घरासमोर Mukesh Ambani’s Antilia residence) स्फोटकांची गाडी का ठेवण्यात आली त्याची कारणं समोर आली आहेत. सचिन वाझे याला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र त्याचा डाव त्याच्यावरच उलटला आणि वाझे जेलमध्ये गेला.
नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ अशी ख्याती असलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. जवळपास 16 वर्षांनंतर ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट (Crime Investigation Unit ) अर्थात CIU चे प्रमुख पद देण्यात आले होते. मात्र मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्याच्यावर आरोप झाल्यानंतर, आता त्याला पुन्हा पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ( Mukesh Ambani’s Antilia residence) स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन याची होती. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत national investigation agency mumbai ने सचिन वाझेला अटक केली. सध्या तो कोठडीत आहे.
NIA ने कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात सचिन वाझे याने अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली होती याच्या कारणाचा उलगडा केला आहे. यासंबंधीचे वृत्त टिव्ही 9 ने दिले आहे.