Nayantara Tigress News : ताडोबातील नयनतारा वाघिणीच्या एका कृतीची रंगलीय देशभर चर्चा; कारण काय ? जाणून घ्या
Nayantara Tigress News : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘नयनतारा’ या वाघिणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. नयनतारा या वाघिणीनी केलेली एक कृति संपुर्ण मानव जातीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरली आहे. तीच्या याच कृतीची संपुर्ण देशभर चर्चा रंगली आहे. (Nayantara Tigress in Tadoba Andhari Tiger Reserve)
सोशल मीडियावर वायरल झालेला हा व्हिडिओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘नयनतारा’ या वाघिणीचा आहे. नयनतारा ही वाघिण जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्या पाणी पिण्यास गेली होती. बंधाऱ्यावर पाणी न पिता नयनतारा वाघिणीने पाण्यात पडलेली प्लास्टिक बाटली तोंडात धरली. पाणी न पिताच नयनतारा बाटली घेऊन माघारी परतली. हे दृश्य वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर – Deep Kathikar यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले आहे.
वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर – Deep Kathikar यांनी हा व्हिडीओ मीडियावर पोस्ट करताच काही क्षणात हा व्हिडीओ तूफान वायरल झाला. पर्यावरण रक्षणासाठी नयनतारा वाघिणीने संपुर्ण मानवजातीला दिलेल्या संदेशाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.