NCP MLA disqualification case result : 10 व्या सुचीनुसार कार्यवाही करता येणार नाही, असं का म्हणाले राहूल नार्वेकर ? वाचा संपूर्ण निकाल
NCP MLA disqualification case result : अजित पवार गटाचे आमदार अपात्र करावेत, अशी शरद पवार (Sharad Pawar) गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दाखल केलेल्या याचिकेवर नार्वेकर यांनी आज मोठा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांचाच असल्याचा निर्णय याआधी दिला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातील बहुमताच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला आहे. त्याचबरोबर दहाव्या अनुसूचीनुसार कार्यवाही करता येणार नसल्याचे म्हटले आहे. नार्वेकर यांनी दिलेल्या निकालातील काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकतं नाही, पण विधिमंडळात बहुमत कोणाचं आहे, ते पाहूनच निर्णय द्यावा लागेल असे म्हणत विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शरद पवार गटाची आमदार अपात्रता प्रकरणाची याचिका फेटाळून लावली. विधीमंडळात बहुमताचा विचार करता अजित पवार गटाकडे 54 पैकी 41 आमदारांचे बहुमत आहे. शरद पवार गटाने हे नाकारले होते. बहुमताच्या आधारे राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचाच असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. निवडणूक आयोगातील लढाई जिंकल्यानंतर अजित पवारांनी विधिमंडळातील लढाई जिंकली. पुतण्याने काकाला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे. (NCP MLA disqualification case result)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले ?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचा निकाल वाचून दाखवला यावेळी नार्वेकर म्हणाले, मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फुट पडलेली नाही. मात्र दोनगट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्रीवर मत नोंदवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. (NCP MLA disqualification case result)
अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा
आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.
दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका
शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. (NCP MLA disqualification case result)
एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही. नेतृत्व रचना, पक्षीय घटना आणि विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल.यामध्यो पक्षीय घटना व नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही. (NCP MLA disqualification case result)
NCP MLA disqualification case result : 10 व्या सुचीनुसार कारवाई करता येणार नाही
विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. राष्ट्रीय कार्यकारणीनं निवडल्यानं अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी. अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र. सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत. नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. (NCP MLA disqualification case result)
अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही. शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळल्या. अजित पवार गटाच्या याचिकाही फेटाळल्या. कुणीही अपात्र नाही. (NCP MLA disqualification case result)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा