NEET UG Result 2023 Today : NEET UG चा निकाल आज जाहीर होणार, डायरेक्ट https://neet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करा आणि निकाल पहा !
NEET UG Result 2023 Today: NEET UG च्या उमेदवारांची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता आहे. आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून NTA NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार NEET च्या अधिकृत वेबसाईटवर neet.nta.nic.in जाऊन निकाल पाहू शकतात. दरम्यान, नीट यूजीची परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती.
NEET UG निकाल 2023 तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी National Testing Agency – NTA https://neet.nta.nic.in/ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.जिथे उमेदवार ॲप्लीकेशन नंबर आणि बर्थ डेटच्या मदतीनं लॉग इन करून त्यांचा निकाल पाहू शकतील.
फायनल आन्सर-की देखील होणार जारी
NEET 2023 परीक्षेचं आयोजन 7 मे 2023 रोजी करण्यात आलं होतं. यंदा सुमारे 21 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. प्रोव्हिजनल आन्सर-की यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे,त्यावर हरकतीही मागविण्यात आल्या होत्या. आक्षेपांचा विचार केल्यानंतर अंतिम आन्सर-की जाहीर केली जाईल. आजच निकालांसोबत फायनल आन्सर-की देखील जारी केली जाऊ शकते.
आज निकाल लागण्याची शक्यता?
आधी NEET परीक्षेचा निकाल 15 किंवा 16 जूनला लागणार होता, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता निकाल आज म्हणजेच 13 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर निकाल जाहीर होऊ शकतो. निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही NEET ची अधिकृत वेबसाईट पाहु शकता.यासाठी, वर नमूद केलेल्या वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही https://ntaresults.nic.in/ ला देखील भेट देऊ शकता.
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा पाहाल?
आज NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही नीटची अधिकृत वेबसाईट वर जाऊन निकाल पाहू शकता.
1) निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
2) येथे होमपेजवर NEET UG 2023 Result नावाची लिंक असेल, त्यावर क्लिक करा.
3) नवीन पेज ओपन होईल.या पेजवर तुम्हाला तुमचा ॲप्लीकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल.
4) डिटेल्स टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर बाजुला असलेल्या प्रिंट पर्यायावर क्लिक करुन तुम्ही प्रिंट काढू शकता.