नवउद्योजकांच्या कामाची बातमी : उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप नाविन्यता यात्रा, जाणून घ्या तालुकानिहाय संपूर्ण वेळापत्रक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १५ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या राज्यातील १३४ युवक-युवतींना रुपये १० हजारापासून ते रुपये १ लाखापर्यंतचे पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
नाविन्यता कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कोठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतू काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाही, त्यामुळे अहमदनगर जिल्हयातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी जिल्हयामध्ये स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन १७ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर, २०२२ या कालावधीमध्ये तालुका स्तरावर करण्यात आले आहे. यामध्ये युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे अहमदनगर जिल्ह्यातील तालुकास्तरीय वेळापत्रक खालील प्रमाणे. (New Entrepreneurs News, Maharashtra Startup Innovation Yatra to pass through Ahmednagar District, 17th August 2022 to 1st September 2022 complete schedule of Yatra)
पारनेर : १७ ऑगस्ट रोजी दु.०२.०० ते सायं. ०६.०० वा. न्यू आर्टस, कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर व सुपा बस स्टॅन्ड
श्रीगोंदा : १८ ऑगस्ट रोजी दु.०२.०० ते सायं. ०६.०० वा. श्री. कुंडलिकराव रामराव जगताप पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिपळगाव पिसा. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सोनिया गांधी पॉलिटेक्नीक
कर्जत : २४ ऑगस्ट रोजी दु.०२.०० ते सायं. ०६.०० वा. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, दादापाटील कॉलेज, राजेंद्र जोतीराम फुले पॉलिटेक्नीक.
अकोले : २७ ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु. ०१.०० वा फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्नीक, एटीईएस टेक्नीकल कॅम्पस व गर्दीच्या ठिकाणी.
जामखेड : २९ ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु.०५.०० वा. डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पॉलिटेक्नीक कॉलेज व गर्दीचे ठिकाण.
संगमनेर : २९ ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु.०१.०० वा. लोकपंचायत ग्रामिण टेक्नीकल ट्रेनिंग इन्स्टिट्युट प्रा. लि., कुरकुंडी, अमृतवाहीनी कॉलेज, एस एन आर्टस, मालपाणी कॉमर्स कॉलेज
कोपरगांव : २९ ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु. ०१.०० वा. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कोपरगाव, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व गौतम पॉलीटेक्नीक इन्स्टिटयूट.
राहाता : २९ ऑगस्ट स.०९.०० ते दु. ०१.०० वा. श्री साईबाबा प्रायवेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डी, एएससी कॉलेज, आर्टस कॉमर्स, सायन्स कॉलेज
राहूरी : २९ ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु.०१.०० वा. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नवयुग कॉलनी तांदूळवाडी, स्टेशन रोड राहूरी
पाथर्डी : ३० ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु. ०१.०० वा. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पाथर्डी बाबूजी कॉलेज, आनंद कॉलेज.
श्रीरामपूर : ३० ऑगस्ट रोजी दु. ०२.०० ते सायं. ०६.०० वा. झेव्हीअर टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर, स्वामी सहजानंद भारती कॉलेज.
नेवासा : ३० ऑगस्ट रोजी स.०९.०० ते दु. ०१.०० वा. ज्ञानेश्वर पॉलिटेक्नीक भानसहिवरे, कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर सोनई, श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा.
अहमदनगर : ०१ सप्टेंबर दु. ०२.०० ते सायं. ०६.०० वा. शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हाधिकारी कार्यालय, विखे पाटील फाउंडेशन विळद घाट.
शेवगाव : ०१ सप्टेंबर रोजी स.०९.०० ते दु. ०१.०० वा. समर्थ प्रा. आयटीआय राक्षी, न्यू आर्टस, कॉमर्स कॉलेज येथे. शेवगाव
०१ सप्टेंबर २०२२ रोजी स.०९.०० ते दु. ०१.०० वा.पद्मश्री डॉ. विखे मेडीकल कॉलेज.
अहमदनगर जिल्हयातील सर्व विद्यार्थी व नवउद्योजकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नोंदणी करुन सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी केले आहे.