जामखेड टाईम्स वृत्तसेवा : नाशिक जवळील लहवित – देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रूळावरून घसरण्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेत अनेक प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सेंट्रल रेल्वेकडून मदतीसाठी हेल्पलाईन नंबर (Railway Helpline Number) जारी करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, रविवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास नाशिकजवळील लहवित- देवळाली या स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एलटीटी – जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले.
रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत रेल्वेकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.मध्य रेल्वेने ट्विटरवर अपघाताची माहिती दिली असून यात मदत पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे म्हटले आहे.
मध्यरेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी
• पब्लिक हेल्पलाईन नंबर नाशिक 0253-2465816
• हेल्पलाईन नंबर – 022 67455993
• हेल्पलाईन नंबर (CSMT station TC office) – Railway : 55993
• MTNL: 02222694040
दरम्यान या घटनेत एका प्रवाश्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे, तर सहा प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या गाड्या रद्द
1) 12109 डाऊन,मुंबई – मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) 12110 अप,मनमाड – मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्स,ऊद्या दि.4 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
3) 11401 डाऊन,मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्स, आज दि.3 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचे मार्ग परिवर्तन केले
1) 22221 डाऊन,मुंबई – हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी वसई रोड,नंदुरबार,जळगांव मार्गे वळविण्यात आली आहे.
2) 12261 डाऊन,मुंबई – हावडा दुरंतो सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी वसई रोड,नंदुरबार,जळगांव मार्गे वळविण्यात आली आहे.
3) 12173 डाऊन,लो.टि.टर्मिनस – प्रतापगढ उद्योगनगरी सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी लोणावळा, पुणे, दौंड, मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे.