Ahmednagar climbers Accident | अहमदनगर : इंद्रप्रस्थ टेकर्सच्या गिर्यारोहकांचा मनमाडजवळील डोंगरावर अपघात, दोन ठार तर एक जखमी
नाशिक : मनमाड (manmad) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत हळबीची शेंडी (Halabichi Shendi) अर्थात अंगठ्या डोंगरावर एक अपघाती घटना घडली आहे. या घटनेत अहमदनगरमधील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू (climbers accidental death in manmad) झाला आहे तर एक गिर्यारोहक जखमी झाला आहे.
इतर १३ गिर्यारोहक सुखरूप आहेत. हे सर्व गिर्यारोहक अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे (Indraprastha Trekkers Group Ahmednagar) सदस्य आहेत. बुधवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे आठ मुली आणि सात मुले असा १५ जणांचा संघ बुधवारी सकाळी गिर्यारोहणासाठी मनमाड पासून जवळच असलेल्या हळबीची शेंडी अर्थात अंगठ्या डोंगरावर गेला होता.
हे सर्व गिर्यारोहक अंगठ्या डोंगरावर चढले. तेथून पुढे अंगठ्याच्या आकाराच्या सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली. आधारासाठी त्यांनी खिळ्यांच्या सहाय्याने दोरखंड बांधला होता.
अंगठ्याच्या सुळक्यावरुन हे सर्व गिर्यारोहक खाली उतरत असताना सर्वात शेवटी असलेले अनुभवी गिर्यारोहक मयूर म्हस्के, अनिल वाघ आणि अजून एक जण असे तिघे घसरुन पडले.
सहकाऱ्यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थही मदतीला धावले. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नाहीत.