Rohit Pawar North Maharashtra tour | आमदार रोहित पवार यांच्या समोरच भिडले राष्ट्रवादीचे 02 गट : ‘या’ नेत्याच्या फोटोवरून झाला राडा
Rohit Pawar North Maharashtra tour In Dhule, two NCP groups clashed in front of MLA Rohit Pawar
धुळे : Rohit Pawar North Maharashtra tour | राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या समोरच राष्ट्रवादीची (NCP) गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर (Digital banner)धुळे येथील एका वरिष्ठ नेत्याचा फोटो नसल्याच्या कारणावरून दोन गटांत धक्काबुक्कीची घटना घडली.या घटनेमुळे धुळे राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.यामुळे पवार यांच्या दौर्याला गालबोट लागले. (In Dhule, two NCP groups clashed in front of MLA Rohit Pawar)
कर्जत – जामखेड मतदारसंघाचे (Karjat – Jamkhed constituency) आमदार तथा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. (Rohit Pawar North Maharashtra tour) शुक्रवारी त्यांचे धुळ्यात आगमन होणार होते. धुळ्यातील पारोळा रोड (Parola Road) चौफुल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांचे ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत केले. (NCP workers gave a warm welcome to MLA Rohit Pawar.)
आमदार रोहित पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पारोळा रोड चौफुला परिसर डिजीटल बॅनरने सजवण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी ठरले होते.परंतु काही बॅनरवर राष्ट्रवादीचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे (MLA Anil Gote) यांना स्थान नव्हते.गोटे हे पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व वरिष्ठ आमदार आहेत,
असे असतानाही एका गटाने गोटे यांना बॅनरवर स्थान दिले नव्हते. ही बाब पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत भदाणे (Prashant Bhadane) यांच्या निदर्शनास आली होती. आमदार पवार यांचे आगमन होताच भदाणे यांनी या प्रकाराची पवार यांच्याकडे तक्रार केली.
गोटे हे वरिष्ठ नेते असतानाही त्यांचा फोटो बॅनरवरून जाणून बुजून डावलण्यात आल्याची बाब पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार (District President of NCP Youth Front Kunal Pawar) यांनी ही बाब जाणीवपूर्वक झाली नसल्याचा उल्लेख केला. या कारणावरून आमदार पवार यांच्यासमोरच प्रशांत भदाणे आणि कुणाल पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
दरम्यान हा वाद सुरू असतानाच आमदार रोहित पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद न साधतात लगेच एकवीरा मातेचे दर्शन घेण्यासाठी निघून गेले.मात्र यानंतर प्रशांत भदाणे आणि कुणाल पवार यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.काही कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटांकडून हमरीतुमरी सुरूच होती.
आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्याला पक्षांतर्गत गटबाजीचे गालबोट लागल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. धुळे राष्ट्रवादीत यापुर्वी गटबाजी उफाळून आली होती. त्यात पवार यांच्यासमोर पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली. धुळे राष्ट्रवादीत सुरू असलेल्या कुरबुरीला आवर घालण्यासाठी पक्षाकडून ठोस पाऊले उचलणे आता आवश्यक आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते या सर्व प्रकारावर काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
web titel : Rohit Pawar North Maharashtra tour | In Dhule two NCP groups clashed in front of MLA Rohit Pawar