Sandesh Kajale Murder Case : नाशिकमध्ये सराईत गुंडाची हत्या, आधी अपहरण मग खून अन् मोखाडा घाटात अर्धवट जळालेला मृतदेह !
नाशिक : Sandesh Kajale Murder Case : राज्यात गेले काही दिवसांपासून खूनाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिकमधूनही खुनाची आणखीन एक घटना समोर आली आहे. या घटनेत नाशिकमधील एका सराईत गुंडाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik latest Murder News)
नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरात खूनाच्या तीन घटना घडल्या आहेत. नाशिकच्या पंचवटी भागातून संदेश चंद्रकांत काजळे – Sandesh Chandrakant Kajale (वय 35, रा विजयनगर, सिडको ) या सराईत गुंडाची पैश्याच्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मयत संदेश काजळे हा पंचवटी भागातील गंभीर गुन्ह्यात सहभागी असायचा, त्याचा खाजगी सावकारकीचा व्यवसाय होता. आर्थिक वादातून त्याच्याच मित्रांनी त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. (Sandesh Kajale News)
Sandesh Kajale Murder Case नेमकी घटना काय ?
संदेश काजळे हा दारूच्या नशेत असताना त्याच्या चार ते पाच मित्रांनी काजळे याचे निमाणी बसस्थानक परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमधून अपहरण केले होते. गाडीत डांबून काजळे याला नेण्यात आले. नाशिक (Nashik) शेजारील पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा घाटात (Mokhada Ghat) त्याचा खून (Murder) करण्यात आला. यावेळी आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी संदेश काजळे याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने जाळण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस तपासात समोर आले.(Sandesh Kajale Murder Case)
दरम्यान, आज 11 रोजी मोखाडा घाटात संदेश काजळे या सराईत गुन्हेगाराचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून येताच नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली.मोखाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर नाशिक पोलिसांना मोखाडा पोलिसांनी कळवले.
संदेश काजळे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
सराईत गुन्हेगार संदेश काजळे हत्या प्रकरणात नाशिक पोलिसांनी वेगाने तपास करत एकास अटक केली आहे. पोलिसांनी काजळे हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार स्वप्निल उन्हवणे (swapnil unhavane arrest news) याला अटक केली आहे. अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणातील इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे वेगवेगळी पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली आहेत. (Sandesh Kajale Murder Case Nashik)