Jawad cyclone threat | आता जवाद चक्रीवादळाचा धोका : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, येलो अलर्ट जारी

पुढील काही तासांत राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jawad cyclone threat | महाराष्ट्रात यंदा पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे.(Heavy rainfall in maharashtra) विशेषता: अतिमुसळधार पावसाचा फटका अनेक भागांना बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील बहुतांश जलाशये तुडूंब झाली आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आता पडणारा पाऊस महापुराचा आमंत्रण देणारा ठरू लागला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळानं (Cyclone Gulab) मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. आता महाराष्ट्राला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. (Now Jawad cyclone threat Warning of heavy rains in Maharashtra yellow alert issued in many districts)

गुलाब चक्रीवादळानंतर अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या शाहीन चक्रीवादळानं (Cyclone Shaheen) ओमान देशाला जबरदस्त तडाखा दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान शास्त्रज्ञ के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे.त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसांत या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. (A low pressure area has been activated along the Kerala coast.) आज हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जरी केला आहे.

या चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यात 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित चक्रीवादळाचं नामकरण जवाद  (Cyclone Jawad) असं करण्यात आलं आहे. दुसरीकडे आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर-दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी (Yellow alert) करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन तासांत पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा, कोकण आणि घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती कायम रहाणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

web titel : Jawad cyclone threat | Now Jawad cyclone threat Warning of heavy rains in Maharashtra yellow alert issued in many districts