छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले विधान भवनात अभिवादन
मुंबई, दिनांक 19 फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज 19 फेब्रुवारी, 2025 रोजी विधान भवनातील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळ पासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्यांच्या निनादाने दुमदुमून गेला होता.पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राजेश विटेकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, सह सचिव शिवदर्शन साठ्ये, उप सचिव राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, श्रीमती स्वाती ताडफळे, उमेश शिंदे, अवर सचिव प्रकाश खोंदले,विजय कोमटवार, मोहन काकड, श्रीमती सीमा तांबे, आशिष जावळे, पुष्पा दळवी, सुरेश मोगल, मंगेश पिसाळ, श्रीमती प्राजक्ता कुळकर्णी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.