जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राला हादरवणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. ही घटना सांगली (sangali) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील म्हैसाळ (Mhaisal)गावातूून सोमवारी उघडकीस आली आहे. (9 members of the same family committed suicide in Mhaisal village in Miraj taluka of Sangli,veterinary doctor’s family commit suicide)
याबाबत सविस्तर असे की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावातील अंबिकानगर (Ambikanagar) येथे राहणारे पशुवैद्यकीय डाॅक्टर कुटुंबातील 9 जणांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस ( miraj police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्हा हादरून गेला आहे.
डाॅक्टरशी बराच वेळ फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतू संपर्क होऊ शकला नव्हता, तसेच डाॅक्टरांच्या घराचा दरवाजा सकाळी उशिरापर्यंत उघडला नव्हता, त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी डाॅक्टरांच्या घराकडे धाव घेतली. गावकरी आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोन करून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीच फोन उचलला नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता ग्रामस्थांच्या निदर्शनास धक्कादायक दृष्य दिसले, डॉक्टरच्या घरात पाच जणांचे मृतदेह तर त्यांच्या भावाच्या घरात चौघांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. विसरून सर्वांनी आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. (9 members of veterinary doctor’s family commit suicide)
दरम्यान या दोन कुटूंबांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र या कुटुंबाने आपले आयुष्य का संपवलं ? या कारणाचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या कुटुंबाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. दरम्यान सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय येतं त्यानंतरच अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.
धक्कादायक : वीज खंडीत केली जाणार.. मॅसेजवर विश्वास ठेवला.. दीड लाखाला चुना लागला
दरम्यान सांगली जिल्ह्यातील मिरज पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हैसाळ या गावातील अंबिकानगर याठिकाणी दोघा भावांनी आपले अख्खं कुटुंब संपवलयं. एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
म्हैसाळ घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांंची नावे
- पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक येल्लाप्पा वनमोरे,
- आक्काताई वनमोरे (डाॅक्टरची आई)
- रेखा माणिक वनमोरे (डाॅक्टरची पत्नी),
- प्रतिमा वनमोरे ( डाॅक्टरची मुलगी)
- आदित्य वनमोरे (डाॅक्टरचा मुलगा)
- पोपट येल्लाप्पा वनमोरे ( डाॅक्टरचा भाऊ)
- अर्चना वनमोरे ( डाॅक्टरची भावजय)
- संगीता वनमोरे ( डाॅक्टरची पुतणी)
- शुभम वनमोरे ( डाॅक्टरचा पुतण्या)