जामखेड: कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अहमदनगर,पंचायत समिती व नगर पंचायत कर्जत व जामखेड,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे यांच्या माध्यमातुन आणि रुशेल फार्मा दिन प्रा.लिमिटेड,मुंबई यांच्या सहकार्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ‘कर्करोग जागरूकता निदान व उपचार कार्यक्रमांतर्गत कर्करोग प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि 28 व 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय तपासणी शिबिरात नामांकित तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कर्करोगाबाबत आढळणारी लक्षणे पुढीलप्रमाणे
मल प्रवृत्ती अथवा मुत्र प्रवृत्तीच्या सवयीतील बदल,न भरणारी जखम,अनैसर्गिक रक्तस्राव अथवा अन्य कोणताही स्राव,शरीरात कोठेही आढळणारी गाठ,अपचन किंवा अन्न गिळण्यास होणारा त्रास,शरीरावरील तीळ किंवा वांग यामध्ये अचानक होणारा बदल,बदललेला आवाज व सतत खवखवणारा घसा अशी लक्षणे असल्यास गावातील आशा सेविका किंवा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या नावाची नोंद करावी तसेच होणाऱ्या तपासणी शिबिरात तपासणी करून घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
दोन्ही तालुक्यांसाठी शिबाराची वेळ व ठिकाण पुढीलप्रमाणे
सोमवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 01 ग्रामीण रुग्णालय जामखेड व उपजिल्हा रुग्णालय कर्जत. दुपारी 02 ते 05 प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा व मिरजगाव व मंगळवार दि.29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 प्राथमिक आरोग्य केंद्र आरणगाव व कुळधरण दुपारी 02 ते 05 प्राथमिक आरोग्य केंद्र नान्नज व राशीन