जामखेड : आपला स्वभाव दुसर्याला त्रास द्यायचा नाही, अजूनही सांगतो मी त्रास देणारही नाही,पण; आमदार प्रा राम शिंदे यांनी ‘त्या’ विरोधकांना ठणकावले.
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आपला स्वभाव दुसर्याला त्रास द्यायचा नाही, अजूनही मी सांगतो मी त्रास देणार नाही, पण इथून पुढं मात्र सहकार्य करायचं का नाही एवढा मात्र माझा अधिकार असणार आहे.डाॅक्टरच्या विरोधात अरूण वराटांनी निवडणुक लढवली,दोन महिन्यात म्हणले,काम करा राव तेवढं,म्हणलं अत्ताच तुम्ही आमच्या विरोधात निवडणूक लढले, काय करा तुमचं, पण त्यांच्या काॅलेजला मंजुरी दिली, डाॅक्टरला म्हणलं द्या सोडून, विरोध केलेल्यांना सुध्दा मदत केली. ते म्हणले आम्हाला वापरून घेतलं, आता कोणी वापरलं तुम्हीच सांगा, काॅलेज कोणामुळंय, माझ्यामुळयं, ते ज्यांचे म्हणतात ते विरोधी पक्षात होते. आमच्या माणसाच्या विरोधात उभे राहिले तरी तुम्हाला काॅलेज दिलं ना, ते म्हणतात आम्हाला वापरून घेतलं, कधी वापरलं सांगितलं पाहिजे ना?, आपण वापरून घ्यायचं काम करत नाही, असे म्हणत विखे समर्थक वराट बंधूंचे आमदार प्रा राम शिंदे यांनी चांगलेच वाभाडे काढले.
आमदार शिंदे पुढे म्हणाले, जे संचालक दिसतात ना बँकेचे त्यांना सुध्दा माझचं सहकार्य होतं, आम्हाला मतं द्यायची म्हटलं की अवघड होतं, आमचा विचार ऐकायचा म्हणलं की अवघड होतं, ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबरोबर युती केली. सुचक नसताना फाॅर्म भरला आणि उपमुख्यमंत्र्याचा दाब आणून तो फाॅर्म मंजुर केला.आम्ही घरून उठून तुमचा फाॅर्म भरायला गेलो.आमच्याबरोबर मतदार होते.आमच्याकडे काहीच मतदार नव्हते पण फाॅर्म भराय पुरते आमच्याकडे माणसं व्हते, पण आम्ही तुमच्या मागे उभे राहायची भूमिका घेतली. पण तुम्ही रोज उठून सांगतात आमचे नेते ते आहेत, अजून सांगा काही प्रॉब्लेम नाही, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी राळेभात बंधूंविरोधात हल्ला चढवला.
आजपर्यंत तीनदा आपल्या बाजूने चिठ्ठी निघाली आहे, चौथी पण चिठ्ठी आपल्याच बाजूने लागेल. काळजी करू नका असे सांगत आमदार शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकरी निवास बांधायचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकार घेतलेला आहे. जामखेडचाही प्रश्न लवकर मार्गी लागेल. माझ्या मंत्रिपदाच्या काळात बाजार समितीत जी विकास कामे झाली त्यात येत्या पाच वर्षांत अधिक भर घालू. राज्यात जामखेड बाजार समितीचा नावलौकिक होईल असे काम करून दाखवू, असा विश्वास यावेळी आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.
आमच्यापासून कोणीही जाऊ शकतं, एक जणाला म्हणले, आता तुम्ही फुटले खरं, पण राम शिंदेंचं सरकार यायचयं, नाही म्हणले कसयं हे त्रास देतेत पण ते त्रास देऊ शकत नाही, ते त्रास देतात नाही म्हणून तिकडं जायचयं, मन तिकडं गेलं तरी सांगतयं राम शिंदेच चांगलाय असे म्हणत विरोधात गेलेल्यांच्या मनात काय आहे, हे आमदार राम शिंदे यांनी सांगत, आगामी काळात राजकीय पटावर उलथापालथी होणार असल्याचे संकेत दिले.
मागच्या निवडणुकीत आपले 13 उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी आपल्या सोबत होती. त्यांना बरोबर घेतलं आणि सन्मानाने वागवलं पण,आता जे त्यांच्याबरोबर गेलेत ते ऐकमेकांविरोधात बोलतात.परत म्हणतात आमचे हेच नेतेत. तिथून बाजूला झालं की म्हणतात, आम्हाला त्रास देतात.पण बोलायला काहीच राहिलं नाही, बोलता येत नाही. मी पण लय दम काढला. दोन महिन्याच्या नंतर टीव्हीपुढं जाऊन बोललो. सगळं तुम्ही ऐकलयं, असे म्हणत आमदार शिंदे यांनी विखे समर्थकांचे वाभाडे काढले.
सर्व शक्ती एका बाजूला असताना कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. बाजार समितीच्या विजयाचे खरे शिल्पकार कार्यकर्ते आहेत. हा विजय फक्त जामखेड पुरता राहिला नाही, तर तो महाराष्ट्रात गाजला. गेल्या अडीच तीन वर्षात माझ्याशिवाय कोणीच नाही या आविर्भावात ‘जे’ वागत होते ‘ते’ मार्केटच्या निकालानंतर जमिनीवर आले. आता लोकांना म्हणायला लागलेत. तुमचं कसयं, आमचं कसयं, अगोदर विचारत होते का? अगोदरची भाषा काय? अत्ताची भाषा काय? आता त्यांच्या भाषेत बदल झालाय, हे केवळ आणि केवळ जनतेने जो कौल दिला त्यामुळं घडतयं. असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला.
जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांचा पदग्रहण समारंभ सोमवारी जामखेड बाजार समितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती शरद कार्ले यांनी पदग्रहण केले. यावेळी आमदार शिंदे यांच्या हस्ते सर्व 9 संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा.राम शिंदे बोलत होते.
ज्या दिवशी आपल्या पॅनलचे 9 उमेदवार बाजार समिती निवडणुकीत निवडणूकीत निवडून आले, त्याचदिवशी मी सांगितलं होतं की, सभापतीपदाची ईश्वर चिठ्ठी ही आपलीच निघेल, आणि घडलही तसेच, आपलीच चिठ्ठी निघाली. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी प्राप्त झाली. शरद कार्ले हा कार्यकर्ता सभापती झाला. मार्केटची निवडणुक लागल्यावर शरदला निवडणुक लढवायची असं सांगितलं, मला नको वाटतयं असं शरद बोलला पण त्याला बोललो आता माघार नाही, ही निवडणूक लढवायचीय. शरदने ही निवडणूक लढवली. सर्वाधिक मतांनी जिंकून आला. माझी नजर काय कमीय का? मी रोज असा वरून राजकारण करतो काय? नजर पडली की सोनंचयं आणि आमची नजर वाकडी करून पळून जाणाराचं खतचयं, झालयं काही जणांचं, हळू हळू पुढं येईल. असे आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, मागील निवडणुकीत दिलेला शब्द तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं, जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमांतून संपुर्ण तालुक्यामध्ये काम केलं, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. पुर्वी आपल्या तालुक्याला टँकर लागायचे, परंतू गेल्या चार पाच वर्षांपासून टँकर लागत नाहीत, कृषिचं उत्पन्न वाढलं, त्यामुळे बाजार समितीही चांगली चालू लागली, सभोवतालच्या ज्या काही बाजार समित्या आहेत, त्यात जामखेडची बाजार समिती अव्वल आहे.
शिंदे पुढे म्हणाले, जामखेड बाजार समितीला महाविकास आघाडी सरकारने सापत्नपणाची वागणूक दिली. संपूर्ण राज्यात कोरोनाची परिस्थिती असताना सगळ्या मार्केट कमिट्यांच्या संचालकांना मुदतवाढ दिली गेली परंतू जामखेडच्या संचालक मंडळाला मुदतवाढ न देतात बाजार समितीवर दोन वर्षे प्रशासक आणला गेला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी गेलो की लगेच विरोधकांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्या, म्हणले नेमकं जयंतीचचं निमंत्रण द्यायला गेले का ? एखाद्या कामाला स्थगिती द्यायला गेले. परंतू दोन वर्षे जामखेड बाजार समितीवर प्रशासक कोणी आणला ? निवडून दिलेल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये मुदतवाढ दिली जाते, मात्र कर्जत जामखेडमध्ये दिली जात नाही. हे कशाचं द्योतक आहे? असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
तुम्ही लोकांची आडवा आडवी केली, त्याचं तुम्ही आता दररोज फळ भोगताय,आपल्याकडं आता नवीनच पर्व आलंय – आमदाराची गाडी आडवल्याशिवाय रस्ता मंजुर नाय, माझी तर दहा वर्षाच्या काळात कधी कोणी गाडी आडवली नाही, पण रस्ते मात्र मी केले. पण आता जे पेरतो तेच उगवते, दिवसा सांगायचं बसायचं तिथं बसा, आम्ही काही तुमचं बघत नाही, दुसर्या गाडीत जाऊन बसतो, रातच्या बारा वाजता परत मिटींग घेऊन सांगायचं, पण त्या आधी सांगितलं असतं तर काय फरक पडला असता ? पण लोकांना आडवायचं, लोकांना वेठीस धरायचं, मग लोकांना काम केलं असं सांगायचं, मधल्या दोन अडीच वर्षांच्या काळात लोकांना ते पटायचं, आता पटतं नाही, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी खर्ड्यात दोन दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेवरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले.
शिंदे म्हणाले की, सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, म्हटलं सांगा काय करायचं ? सगळे म्हणले तुम्हाला वाटेल तो निर्णय घ्या, उमेदवार देताना आपण सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सभापती – उपसभापतीपदाच्या उमेदवारी मी 11:50 मिनिटांनी जाहीर केली. कोणाचं काहीही म्हणणं आलं नाही. याला म्हणायचं कार्यकर्ता आणि याला म्हणायचं नेता. कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनातला निर्णय झाला म्हणून काही अडचण आली नाही. चिठ्ठीवर आपला सभापती झाला. पण दुर्दैवाने आपला उपसभापती झाला नाही. पण पलिकडे मात्र फाॅर्म भरूस्तोवर माहित नव्हतं कोणाचा फाॅर्म भरायचाय तो, तिथचं आदळ आपट सुरू झाली, माझा भरायला पाहिजे व्हता, ह्याचा कसा भरला.
शिंदे म्हणाले की, देवानं आपल्याला थोडंफार डोकं दिलयं, राईट कार्यक्रम केला.तोही परफेक्ट झाला. कोणी काहीही केलं तरी लोकं म्हणतात राम शिंदे लै नशिबवान आहे,मग झाला का नाही चिठ्ठीवर सभापती, नशीबवान असल्याशिवाय ही थोडीच गोष्टय, रोज दिवस उगवल्यापासून लोकांना त्रास द्यायचा अन् देवा मला पाव म्हणायचं, कसा देव पावनं? देव पावतचं नाही, असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
बाजार समिती निवडणुकीसाठी सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन मतदारसंघातील मतदार हे क्रिम मतदार आहेत,या मतदारांनी आपल्याला कौल दिला. आपल्या तालुक्यात जरी बराबरी झाली असेल असे तुम्हाला वाटतं असेल तरी एकुण झालेल्या मतदानात आपण 74 मतांनी पुढे आहोत. याचा अर्थ बराबरी झालेली नाही. तर आपण पुढे आहोत, असेही यावेळी आमदार राम शिंदे यांनी ठणकावून सांगितले.