Padma awards 2022 | प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सायरस पूनावाला पद्मभूषण,महाराष्ट्राच्या वाट्याला आले १० पद्म पुरस्कार; एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषण आणि सात पद्मश्री

नवी दिल्ली, दि. 25, Padma awards 2022 | देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राच्या वाट्याला 10 पुरस्कार आले. यात एक पद्मविभूषण, दोन पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

यावर्षी एकूण 4 मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच, प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण १७ मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातून पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांमध्ये प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे (Singer Prabha Atre) यांना पद्मविभूषण (Padma Vibhushan) तर प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला (Natarajan Chandrasekaran, Dr Cyrus Punawala) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe) यांना मरणोत्तर ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ( Dr bhimsen singhal, Dr Vijaykumar Dongare, Dr Himmatrao Bavaskar)

कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण (Singer Sulochana Chavan) आणि प्रसिध्द गायक सोनू निगम (Playback singer Sonu Nigam) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनिलकुमार राजवंशी (Anilkumar Rajvanshi) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी एकूण 128 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 17 ‘पद्मभूषण’ आणि 107 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. 10 अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मविभूषण

१. प्रभा अत्रे (कला)

२. राधेश्याम खेमका (साहित्य – मरणोत्तर)

३. जनरल बिपीन रावत (सिव्हील सर्व्हीसेस – मरणोत्तर)

४. कल्याण सिंग (पब्लिक अफेअर्स – मरोणत्तर)

पद्मभूषण

१. गुलाम नबी आझाद

२. व्हीक्टर बॅनर्जी

३. गुरमित बावा (मरणोत्तर)

४. बुद्धदेव भट्टाचार्य

५. नटराजन चंद्रशेखरन

६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला

७. मधुर जेफरी

८. देवेंद्र झांजरीया

९. राशीद खान

१०. राजीव मेहेरश्री

११. सुंदरंजन पिचाई

१२. सायरस पुनावाला

१३. संजया राजाराम (मरणोत्तर)

१४. प्रतिभा रे

१५. स्वामी सच्चिदानंद

१६. वशिष्ठ त्रिपाठी