जामखेडचे तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार जाहीर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना कृषि विभागाकडून सन्मानित केले जाते. कृषि विभागाने (Department of Agriculture Awards) विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये जामखेडचे तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर (Rajendra Supekar) यांची ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार 2022’ साठी पुणे कृषि आयुक्तालय विभागातून निवड करण्यात आली आहे. कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. (Padma Shri Vitthalrao Vikhe Patil Agricultural Service Ratna Award 2022)
राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषि पुरस्कारांची निवड करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०२०, २०२१ व २०२२ करीता कृषि पुरस्कार्थीच्या नावांची निवड निश्चित करण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केला आहे. त्यात जामखेडचे तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर (Rajendra Supekar) यांची पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कारासाठी पुणे कृषि आयुक्त विभागातून निवड करण्यात आली आहे.(Padma Shri Vitthalrao Vikhe Patil Agricultural Service Ratna Award 2022)
जामखेड तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची सन 2022 च्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सुपेकर हे 19 सप्टेंबर 1994 साली कृषि विभागात मंडल कृषि अधिकारी म्हणून कोकण विभागात सर्वात प्रथम रूजू झाले होते.गेल्या 30 वर्षांपासून सुपेकर हे यांनी सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून आपली सेवा देत आहे. नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देणारे कर्तव्यदक्ष कृषि अधिकारी म्हणून त्यांची कृषि विभागात ओळख आहे.
त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आजवर सेवा दिली. त्या ठिकाणी थेट बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची, त्यांच्या अडी अडचणी समजून घेण्याची, त्या सोडवण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. थेट गावोगावच्या शेतकरी बांधवांशी थेट संपर्क ठेवल्यामुळे ते शेतकरी वर्गात प्रचंड लोकप्रिय आहेत.
राजेंद्र सुपेकर हे मुळचे कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पुरवण्याबरोबरच शेतकऱ्यांना कृषि सल्ला देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणारे कृषि अधिकारी म्हणून त्यांची कृषि विभागात विशेष ओळख आहे. जामखेड तालुका कृषि अधिकारी म्हणून ते 1 सप्टेंबर 2021 रोजी रूजू झाले. जामखेड तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ज्वारीला राज्यस्तरीय व्यासपीठावर नेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. जामखेडची ज्वारी या नावाने ब्रँड निर्माण करत विविध कृषि प्रदर्शनात विक्रीस ठेवून जामखेडच्या ज्वारीला नवीन ओळख मिळवून दिली.
तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी 19 सप्टेंबर 1994 साली मंडल कृषि अधिकारी म्हणून सुरु केलेला प्रवास आज तालुका कृषि अधिकारी म्हणून सुरु आहे. सध्या जामखेड तालुका कृषि अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या 30 वर्षांच्या शासकीय सेवेत त्यांनी विविध उपक्रम राबवले. शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक उन्नती यावी यासाठी कृषि योजनांचा प्रभावी वापर केला. याशिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला.यामुळे शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहचण्यास मदत झाली.
तूर कांदा इतर व इतर पिकांमध्ये येणाऱ्या कीड व रोग या संदर्भात योग्य वेळी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून त्यांनी केलेला प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला. जामखेडमध्ये उत्पादित होणारी ज्वारी महाराष्ट्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गतवर्षापासून वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा उपयोग करून त्याची प्रसिद्ध केली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती फ्लेक्सच्या माध्यमांतून प्रदर्शित केली. व्हाट्सअप स्टेटस चा उपयोग शेतीतील तंत्रज्ञान व विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे केला. त्यांच्या याच कार्याचा विचार करून कृषि विभागाने राजेंद्र सुपेकर यांची पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.
तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना राज्य शासनाचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त कर्जत-जामखेड मतदारसंघात धडकताच त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार 2022 चे मानकरी खालील प्रमाणे
जामखेडचे तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची पुणे विभागातून तर भिवंडीच्या तालुका कृषि कार्यालयातील कृषि पर्यवेक्षक विवेक काशिनाथ शिंदे यांची ठाणे विभागातून निवड करण्यात आली आहे. तर नाशिक विभागातून सुरगाणाचे मंडल कृषि अधिकारी अनिल बन्सी भोर यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर विभागातून सासकल ता फलटणचे कृषि सहाय्यक सचिन सोमा जाधव यांची तर छत्रपती संभाजीनगर विभागातून बीड तालुक्यातील राजुरीचे कृषि पर्यवेक्षक अर्जून जनार्धन चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर लातुर विभागातून धाराशिव कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि पर्यवेक्षक वैभव प्रभाकर लेणेकर यांची तर अमरावती विभागातून मूर्तीजापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि पर्यवेक्षक विलास लालसिंग चव्हाण यांची निवड करण्यात आली.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला ?
विलास लालसिंग चव्हाण,वैभव प्रभाकर लेणेकर, अर्जून जनार्धन चव्हाण, सचिन सोमा जाधव, अनिल बन्सी भोर, विवेक काशिनाथ शिंदे, राजेंद्र सुपेकर ,