Palak Mantri List Maharashtra 2025 : रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम, पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

Palak Mantri List Maharashtra 2025 :  राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Sarkar) स्थापन होऊन महिना लोटला आहे. सरकारचे कामकाज जोमात सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) यांनी पुढील १०० दिवसांच्या नियोजनाच्या अनुषंगाने बैठकांचा धडाका हाती घेतलाय. तर दुसरीकडे रायगड व नाशिक (Raigad, Nashik) जिल्ह्यांच्या पालकमंत्री (Palak Mantri list 2025) पदावरून वाद निर्माण झाल्याने त्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलीय. हा वाद अजून सुटलेला नाही. नाशिक व रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागले आहे. (Palak Mantri List)

Palak Mantri List Maharashtra 2025, rift for guardian minister post of Raigad and Nashik continues, CM Devendra Fadnavis made big statement about guardian minister post, nashik palak mantri 2025,

नाशिकच्या पालकमंत्रीपदी (Nashik Palak Mantri 2025) गिरीश महाजन व रायगडच्या पालकमंत्रीपदी (Raigad Palak Mantri 2025) आदिती तटकरे या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतू महायुतीत या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून मोठा वाद उफाळून आला. रायगडवर शिवसेनेने दावा ठोकलाय तर नाशिकवर भाजपने दावा ठोकलाय. महायुतीत धुसफुस सुरु होताच या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्यात आली.महायुतीतील या वादामुळे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मंत्र्यांविना पार पडले. (Grirish Mahajan, Aditi Tatkare)

रायगड व नाशिकचे पालकमंत्री आपल्याच पक्षाचे असावेत असा दावा भाजप – शिवसेना – राष्ट्रवादीचा आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आग्रही आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेनेचे जेष्ठ मंत्री दादा भूसे यांची नाशिकच्या पालकमंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी शिवसेनेने दबाव वाढवला आहे. परंतू नाशिकवर भाजपचा दावा कायम आहे. तर रायगडवर राष्ट्रवादीचा दावा आहे. सुनिल तटकरे रायगड सोडण्यासाठी तयार नाहीत.

नाशिक व रायगडच्या वादावर तोडगा कधी निघणार ? नवीन पालकमंत्र्यांची निवड कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतानाच आता याविषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल. काळजी करू नका. सर्वकाही ठिक होईल.

दरम्यान,पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद मिटवण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले आहेत. गोगावेल आणि तटकरे वादावर तोडगा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच रायगडचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्याकडे असलेले मुंबईचे पालकमंत्रीपद काढून ते भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पदावर असा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून रायगडचे पालकमंत्री पद काढून घेतल्यानंतर त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाणार हाही प्रश्नच आहे. नाशिकच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे काय मार्ग काढणार हाही प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.