जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या प्रभाकर साहिल याचा शुक्रवारी मृत्यू झाला, प्रभाकर साहिल हा आर्यन खान प्रकरणात पंच म्हणून समोर आला होता . शुक्रवारी साहिल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Panch Prabhakar Sahil dies in Aryan Khan drugs case)
संपूर्ण देशात गाजलेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी हे नाव चर्चेत आले होते. गोसावी याचा अंगरक्षक म्हणून प्रभाकर साहिल हा काम करत असायचा . आयन खान प्रकरणात प्रभाकर साहीलला पंच बनवण्यात आले होते.आर्यन खानच्या अटकेनंतर साहिल याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. यातून ncbच्या कारवाई अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होत.
दरम्यान आर्यन खानच्या प्रकरणात अनेक उलथापालथी झाल्यानंतर हे प्रकरण थंडावले होते. परंतु या प्रकरणात पुन्हा नवी घडामोड समोर आली.पंच प्रभाकर साहिल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. प्रभाकर साहिल वर अंधेरी येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत