Milind Deora News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, काँग्रेसचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला, शिवसेनेचे बळ वाढणार !
मुंबई | Milind Deora : काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरु होणार आहे. याच मुहूर्तावर काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये गेल्या 55 वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका मोठ्या राजकीय घराण्यातील नेत्याने काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora News) यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत पक्ष सोडत असल्याची घोषणा रविवारी 14 रोजी केली आहे.
मिलिंद देवरा (Milind Deora News) हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत देवरा हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. देवरा यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांची मुंबईत राजकीय ताकद वाढणार आहे.