Prahlad Sawant Parli : पतसंस्थेच्या अध्यक्षाने संपवले आयुष्य, बीड जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील अनेक पतसंस्था, मल्टिस्टेट बँकांच्या घोटाळ्यांचे प्रकरण सध्या गाजत आहे. हजारो ठेवीदार चिंतेत आहेत. अश्यातच बीड जिल्ह्यातून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील एका पतसंस्थेच्या अध्यक्षाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Prahlad Sawant, Chairman of Parli's Pawanraje Urban Nidhi Credit Institution committed suicide

बीड जिल्ह्यातील पवनराजे अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी परळी येथील प्रेम प्रज्ञा नगर भागातील नव्या घरात आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सावंत यांच्या आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही.

परळी शहरात प्रल्हाद सावंत हे पवनराजे अर्बन निधी ही पतसंस्था चालवत होते. त्यांनी काही दिवसांपुर्वी नवीन घर खरेदी केले होते. या घरात राहायला जाण्याआधीच सावंत यांनी नव्या घरात आत्महत्या केली. सावंत यांच्या आत्महत्येच्या घटनेने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असता सावंत यांच्या खिशात काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यातून आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्यता आहे. परळी पोलिस पुढील तपास वेगाने करत आहेत. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.