अवकाळी पावसाने उडवली दाणादाण : राज्यातील अनेक भागात वादळी पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत, पुढील चार दिवस पावसाचे
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: Unseasonal Rain in Maharashtra | राज्यातील अनेक भागात गेल्या काही तासांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली कोल्हापूर या भागात मुसळधार पाऊस सुरू असून, विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाने आज हजेरी लावली. तर दुसरीकडे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सूनचा (Monsoon) प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे (South Arabian Sea) तसेच बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात कालपासून अनेक भागात अवकाळी पाऊस बरसत आहे. सांगली जिल्ह्यात बारा तासापासून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू आहे.या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिरज, जत, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतही जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे आज, शुक्रवारी सकाळी जत तालुक्यात वळसंग ते सोरडी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.
सांगलीत दुपारी चारनंतर ढगांची दाटी झाली. सायंकाळी सव्वापाचपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाच तासांहून अधिक काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक जलमय झाले. पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वाळवा तालुक्यात सायंकाळी सहापासून पावसाची संततधार सुरू होती. दुष्काळी जत तालुक्यात दुपारी तासभर वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस झाला.
सांंगली शहरातील उत्तर शिवाजीनगर, शिवाजी मंडई, मारुती रोड, राजवाडा परिसर, स्टेशन चौक, स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल चौक या ठिकाणी पाणी साचून राहिले होते. गुंठेवारी भागातही पावसामुळे मोठी दलदल निर्माण झाली आहे. ड्रेनेजसाठी खोदलेले रस्तेही चिखलात रुतले आहेत.
तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातही आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला यवतमाळ जिल्ह्यातील काय भागामध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला. त्याच बरोबर विदर्भातील वर्धा तालुक्यातील खरंगणा आणि आंंजी या भागात आज दुपारी वादळी पाऊस झाला. तसेच सिंदखेडराजा तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली तालुक्यातील अनेक भागांमध्ये हा पाऊस झाला.
याशिवाय गेल्या 24 तासात मोहोळ,सांगोला,माढा, हातकणंगले, गडहिंग्लज, राधानगरी,आजरा, शिरोळ, शाहूवाडी,पन्हाळा,गगनबावडा, चंदगड, खेड, लांजा, चिपळूण, देवरुख, राजापूर, मंडणगड, पारनेर, राहुरी या भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांमध्ये मान्सूनचा (Monsoon) प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे (South Arabian Sea) तसेच बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.याशिवाय उत्तर तामिळनाडूच्या (Tamil Nadu) अंतर्गत तसेच त्या भोवतालच्या भागात असलेल्या चक्रवाताची स्थिती (Cyclone) कायम आहे.
परिणामी गेल्या 24 तासात कर्नाटकची किनारपट्टी, अंतर्गत कर्नाटक व केरळ मधील काही ठिकाणी मुसळधार (Torrential) व तामिळनाडूत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह (Thunder) अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ (Vidarbha) व मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या (Heavy Rain in Maharashtra) सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीवर (Goa Coast) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस हे पावसाचे असणार आहेत. यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरु होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.