Pradhan Mantri Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा, काय आहे ही योजना ? जाणून घ्या सविस्तर !
नवी दिल्ली : Pradhan Mantri Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येत सोमवारी प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा पार पडली. हा मंगलमय सोहळा पार पाडून नवी दिल्लीत परतलेल्या पंतप्रधानांनी समस्त देशवासियांसाठी मोठे गिफ्ट भेट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील जनतेसाठी एका महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे. “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” असे या योजनेचे नाव आहे. या योजनेची सोमवारी घोषणा करण्यात आली आहे. (Pradhan Mantri Suryoday Yojana)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून देशातील नागरिकांच्या घरांवर सोलर रूफ टाॅप सिस्टम बसवले जाणार आहे. या योजनेचा देशातील एक कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची माहिती सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक केली आहे. (Pradhan Mantri Suryoday Yojana)
पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांची स्वत:ची सोलर यंत्रणा असावी. अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.(Pradhan Mantri Suryoday Yojana)
सरकारने गरीबांची घरे उजळून टाकण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर छतावर सौर पॅनेल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, भारतीयांच्या छतावर खाजगी सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी यासाठी पंतप्रधानांनी संकल्प सोडला आहे. आपल्या संकल्पाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की, राम मंदिराच्या अभिषेकने आपला संकल्प अधिक दृढ झाला आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील वीज बिलाचा भार कमी होईल. या निर्णयामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही स्वावलंबी होईल, असे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केलेय.(Pradhan Mantri Suryoday Yojana)
“प्रधानमंत्री सूर्योदय योजना” अंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील अभूतपूर्व कार्यक्रमानंतर दिल्लीत परतताच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर आपल्या पहिल्या मोठ्या निर्णयाची माहिती दिली.(Pradhan Mantri Suryoday Yojana)
न थकणारे, न थांबणारे.. आपले नॉनस्टॉप पीएम
अयोध्येहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यवंशी प्रभू श्री रामाच्या प्रकाशातून सर्व भक्तांना ऊर्जा देणारी दूरदर्शी योजना घोषित केली. “प्रधानमंत्री सूर्योदय योजना”अंतर्गत आता भारत सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवणार आहे, यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होऊन ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल,आता ‘हर घर सोलार’, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच न थकणारे, न थांबणारे.. आपले नॉनस्टॉप पीएम आहेत असेही यावेळी फडणवीस म्हणाले. (Pradhan Mantri Suryoday Yojana)