PSI Gopal Gole : भावाच्या मृत्यूचा मानसिक धक्का… मानसिक तणावातून पोलिस उपनिरीक्षकाने संपवले आयुष्य !

PSI Gopal Gole : नागपुरमधून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस वसाहतीत एका पोलिस उपनिरीक्षकाने गळफास (Nagpur psi suicide) घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.

PSI Gopal Gole, Mental shock of brother's death, police sub-inspector Gopal gole ended his life in Nagpur due to mental stress,

मानसिक ताण तणावातून गेल्या काही दिवसांपासून देशाभरात आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अचानक माणसे मृत्यूला कवटाळत आहेत. या घटना महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. अशीच एक घटना नागपुरमधून (nagpur) समोर आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाळ गोळे (psi gopal gole) यांनी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मयत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ गोळे यांच्या भावाचा एका अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेने गोपाळ गोळे यांचे आयुष्यच बदलून टाकले. या घटनेचा मोठा मानसिक धक्का गोळे यांना बसला होता. त्यातून ते अखेरपर्यंत सावरू शकले नाहीत. भावाच्या अपघाती मृत्यूच्या घटनेमुळे मानसिक धक्क्यात असलेल्या गोपाळ गोळे यांना दारूचे व्यसन लागले होते. घरात बायकोसोबत त्यांची रोज वादावादी व्हायची.

घरात सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी गेली. राग शांत झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला फोन केला. मात्र दोन तीन दिवस फोन लागत नाही यामुळे चिंता वाढली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपला नवरा ड्युटीवर आला आहे का याची चौकशी केली. नवरा ड्युटीवर आला नाही मग कुठे गेला याने जीव कासाविस झाला.मनात नको त्या शंका घर करु लागल्या. त्यांनी नवऱ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना विनंती केली आणि शोध सुरू झाला.

सहकाऱ्यांनी पोलीस कॉटर्समध्ये जाऊन पाहिलं तर पायाखालची जमीन सरकरली. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गोळे ज्या अवस्थेत दिसले ते पाहून सहकाऱ्यांना दोन मिनिटं काहीच सुचेनासं झालं.पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गोळे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याची माहिती सहकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. त्यातून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस उपनगिरीक्षक गोपाळ यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडली होती. त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचा मानसिक धक्का त्यांना बसला. त्यातून सावरणं कठीण जात होतं. त्यातच त्यांना दारुचंही व्यसन लागलं आणि घरी बायकोसोबत वाद होऊ लागले.दारुचं व्यसन, मासिक ताण आणि या सगळ्यातून सावरणं कठीण झाल्याने दिवसेंदिवस नवरा बायकोमध्ये वाद वाढत गेले. बायकोनं अखेर माहेरी जाण्याच्या निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून गोपाळ गोळे हे पोलीस वसाहतीत एकटेच राहात होते. तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे.

शितल कलेक्शन जामखेड