Puja khedkar : UPSC नंतर केंद्र सरकारची वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर विरोधात सर्वात मोठी कारवाई !

Puja khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar) यांच्या विरोधात आज केंद्र सरकारने मोठी कारवाई केली. सरकारने पुजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पुजा खेडकर ह्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना वादात सापडल्या होत्या. तेव्हापासून खेडकर यांचे ग्रह फिरले होते. युपीएससीनंतर आता केंद्र सरकारने पुजा खेडकर यांच्यावर बडतर्फीची मोठी कारवाई केली. Puja khedkar latest news, After UPSC, central government’s biggest action against controversial IAS officer Pooja Khedkar,

Puja khedkar  latest news, After UPSC, central government's biggest action against controversial IAS officer Pooja Khedkar,

वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर (Puja khedkar) यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर खेडकर यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. खेडकर यांच्यावर ३१ जुलै रोजी युपीएससी कारवाई करत त्यांची उमेदवारी रद्द केली होती. तसेच यापुढे खेडकर यांना UPSC कडून घेण्यात येणाऱ्या कुठल्याही परीक्षांमध्ये बसता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याबरोबर पुजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश UPSC ने दिले होते. (Puja khedkar latest news)

पुजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांनी दिल्लीच्या पतियाला कोर्टात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. तत्पूर्वी यावेळी झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले म्हणून आपल्याला लक्ष केले जात आहे असा दावा पुजा खेडकर यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला होता. पूजा खेडकर यांनी फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण समाजाला देशाला फसवलं आहे असा म्हणत त्यांच्या अटकेचे मागणी यावेळी युपीएससीने केली होती. (Puja khedkar latest news)

या संपूर्ण प्रकरणानंतर पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास तयार असल्याचे म्हटलं होतं त्यांचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी ही तपासणी करण्याची तयारी दर्शवली होती. (Puja khedkar latest news)

केंद्र सरकारने 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या आदेशाद्वारे खेडकर हिला आयएएस नियम, 1954 च्या नियम 12 अन्वये तात्काळ प्रभावाने भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार, जो व्यक्ती पुर्नपरीक्षेत उत्तीर्ण झालेला नाही किंवा जो व्यक्ती परीक्षा दिल्यानंतरही भरतीसाठी अपात्र आहे किंवा तो सेवेचा सदस्या होण्यासाठी अयोग्य आहे, अशांना केंद्र सरकार सेवेतून काढून टाकू शकते. (Puja khedkar latest news)

दरम्यान, पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तिने तिच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तिने 5 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, तिचे एक अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याची शक्यता पोलिसांनी केली आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (Puja khedkar latest news)

पुजा खेडकर यांच्यावर नेमके आरोप काय ? (Puja khedkar latest news)

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पुजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यांगाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला होता. याशिवाय त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमिलियर सुविधा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच परीक्षेसाठी अर्ज करताना त्यांनी नाव मध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व प्रकरणांचा तपास झाल्यानंतर त्यांच्यावर युपीएससीने कारवाई केली होती. त्यानंतर केंद्र सरकारनेही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुजा खेडकर यांना सरकारने सेवेतून बडतर्फ केले आहे. (Puja khedkar latest news)

दरम्यान, पूजा खेडकर ही 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. यानंतर काही महिन्यापूर्वी तिची सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिची वाशिम इथं बदली करण्यात आली. मात्र याचदरम्यान, पूजा खेडकरने दृष्टिदोष प्रवर्गातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केल्यानंत ती विशेष सवलत मिळाल्यानंतर ती आएएस झाल्याचे समोर आले. (Puja khedkar latest news)

याप्रकरणी तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. मात्र प्रत्येकवेळी ती गैरहजर राहिली. यानंतर पूजा खेडकरने तिच्या स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आले. याशिवाय पूजा खेडकरने परीक्षेचा फॉर्म भरताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचेही यूपीएससीने सांगितलं. यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली. अशातच आता तिला सेवेतून बडतर्फ केले आहे. (Puja khedkar latest news)