Pune Helicopter Crash News Today : खासदार सुनिल तटकरेंना घेण्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर बावधन परिसरात कोसळले, हेलिकॉप्टरचा चुराडा, मृतदेह छिन्नविछिन्न, घटनास्थळावर भयानक दृश्य, 2 वैमानिक व इंजिनिअरचा मृत्यू !

Pune helicopter crash news today : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बावधन (Bavdhan) भागात बुधवारी सकाळी हेलीकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare NCP) यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर निघाले होते. दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर दरीत कोसळले (Helicopter Crash). ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून (Oxford Golf Club Helipad Pune) मुंबईच्या दिशेने हेलिकॉप्टर निघाले होते. हेलीकॉप्टरने अकाशात उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीनच मिनिटांत ते दरीत कोसळले. या घटनेत दोन पायलटसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या (Oxford County Resort Bawdhan Budruk) हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झाला. या परिसरात हे एकमेक हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत असतात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल (HEMRL) नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेच्या मधल्या डोंगराळ भागातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी (KK Construction Hill) येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही अंतरावरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

या अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले. हेलिकॉप्टर सरकारी की खासगी हे अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचीही ओळख पटू शकली नाही.

हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर (Helicopter Crash) इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता.हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला.

सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशीही माहिती आहे.

मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे

हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने पेट घेतला होता. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते. उड्डाण झाल्यानंतर हेलिकॉप्टर पाच मिनिटांतच कोसळले. प्रचंड धुके असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती घटनास्थळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्यामुळे आतमध्ये असणाऱ्या मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेली होती. हे मृतदेह आता ससून रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

४० दिवसातील दुसरी घटना

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची ४० दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते.हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. उर्वरित तीन जणांना गंभीर दुखापत झाली नाही.