(Pune-md-doctor-arrested) महिला डाॅक्टरच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा ०१ जण गजाआड ! तो निघाला चक्क एमडी डाॅक्टर
वैद्यकीय क्षेत्रात उडाली खळबळ
पुणे : भारती हाॅस्पीटलमधील (Bharati University Hospital) एका महिला डाॅक्टरच्या बेडरूमसह बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्याचा शोध लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाला मोठे यश आले आहे. (Pune-md-doctor-arrested)
धक्कादायक बाब म्हणजे हे दुष्कृत्य करणारा दुसरा तिसरा कोणी नसुन एक एमडी डाॅक्टर असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.(Bharati University Hospital) (Pune-md-doctor-arrested)
पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharati University Hospital) परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रुममध्ये स्पाय कॅमेरा (Spy Camera) लावल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एका महिला डाॅक्टरने फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता पोलिसांच्या हाती चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.(Pune-md-doctor-arrested)
डॉ. सुजित जगताप (Dr Sujit Jagtap) या ४२ वर्षीय एमडी डाॅक्टरचा या प्रकरणात हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी डाॅ सुजित जगताप याला अटक केली आहे. (PUNE MD doctor arrested) आज न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.डॉक्टर जगताप याने हा छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरुन मागवला असल्याचं समोर आलं आहे. ३१ वर्षीय महिला डाॅक्टरच्या स्टाफ क्वार्टरमधील बेडरुम-बाथरुममध्ये हिडन स्पाय कॅमेरा सापडला होता.(Bharati University Hospital)
काय आहे प्रकरण? (Pune-md-doctor-arrested)
पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील (Bharati University Hospital) स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता सकाळी ०८: ४५ वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पीडित महिला डाॅक्टरने ०६ जुलै २०२१ रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. (PUNE MD doctor arrested)