महाराष्ट्र हादरला : एमपीएससीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्याने केली आत्महत्या; सुसाईड नोट वाचून व्हाल अंतर्मुख (Pune MPSC student commits suicide)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि.30) दुपारी साडे चार वाजता फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा.गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणार्या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वप्निलने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहली असून, ती गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी आहे. pune MPSC student commits suicide
Despite passing the MPSC exam, a student has committed suicide by strangulation due to stress and financial situation of not having a job yet. The incident took place at 4.30 pm on Wednesday (july 3) at Ganganagar near Fursungi. Swapnil Sunil Lonakar (age 24, resident of Ganganagar, Fursungi) is the name of the student who committed suicide. Swapnil wrote a suicide note before committing suicide, which is thought provoking.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांच्या पत्नी असे दोघेजण संबंधीत व्यावसाय पाहतात. तर स्वप्नीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडीलांना खबर दिली. त्यानंतर त्यास रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
स्वप्नील शिक्षण पुर्ण झाल्यापासून एमपीएससी’च्या परिक्षेची तयारी करीत होता. तो एमपीएससी’च्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दिड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला, कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
माझा स्वप्नील गेला इतर स्वप्नील जावू नयेत; अशी आर्त हाक स्वप्नीलचे वडील सुनिल लोणकर यांनी दिली आहे. स्वप्नील नेहमीच सामाजिक जिवनात आग्रेसर होता. त्याने आत्तापर्यंत 29 वेळा प्लेटलेटचे दान केले आहे. कोरोना, रस्ता सुरक्षा अभियान असो की स्वच्छता मोहीम असा विविध उपक्रमात तो नेहमीच अग्रेसर असायचा. त्याच्या या अकाली जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.