Pune Murder case : आई मुलाला बाहेर काढलं, ACP भारत गायकवाड यांनी उचललं टोकाचं पाऊल.. बंद खोलीत जे घडलं ते हादरवून टाकणारं..
ACP Bharat Gaikwad : सोमवारी पुणे शहर (Pune City) एका हत्याकांडाच्या घटनेनं हादरून गेलं. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने (Police Officer) पत्नी व पुतण्याची गोळ्या घालून हत्या (murder) केल्याची दुर्दैवी घटना (incident) उघडकीस आली आहे. यानंतर पोलिस अधिकाऱ्याने स्वता:वर गोळी झाडून घेत आत्महत्या (suicide) केली. भल्या पहाटे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पुणे व अमरावती पोलिस (Amravati Police) दलात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना कोणत्या कारणातून झाली असावी, याचा शोध पुणे पोलिस (Pune Police) वेगाने घेत आहेत. (Pune Murder case)
अमरावती पोलिस दलातील राजपेठ विभाग (Rajpeth, Amravati) सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या एसीपी भरत शेका गायकवाड (ACP Bharat Sheka Gaikwad) यांनी आपली पत्नी मोनी भरत गायकवाड (वय 44) Moni bharat Gaikwad, पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) Deepak Gaikwad या दोघांची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सुट्टीवर आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
काही दिवसांपुर्वी सहायक पोलिस आयुक्त म्हणून भरत गायकवाड यांची पदोन्नती झाली होती. यापुर्वी ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. (Bharat Gaikwad, Assistant Commissioner of Police, Amravati Police Force) एसीपी भरत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यातील बाणेर (Baner Pune) राहण्यास होते. त्यांची आई, पत्नी, दोन मुले व पुतण्या असे पुण्यात राहत होते. शनिवारी ते सुट्टीसाठी पुण्यातील आपल्या घरी आले होते. सोमवारी पहाटे एसीपी भरत गायकवाड यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकुन धावत आलेल्या पुतण्यावरही त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर स्वता:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
तिघांच्या मृत्यूने पुणे पोलिस दलात उडाली खळबळ
एसीपी भरत गायकवाड यांनी परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार करत पत्नी मोनी भरत गायकवाड (वय 44) Moni bharat Gaikwad, पुतण्या दिपक गायकवाड (वय 35) Deepak Gaikwad या दोघांची हत्या केली. त्यानंतर भरत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) यांनी स्वता: आत्महत्या केली. ही थरारक घटना सोमवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
आई व मुलाला खोलीबाहेर काढले
दरम्यान, पत्नी व पुतण्याची हत्या करण्यापुर्वी एसीपी भरत गायकवाड यांनी आई व मुलाला खोलीबाहेर काढले होते. त्यानंतर खोली बंद खोलीत गायकवाड यांनी आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या, गोळीबाराचा आवाज ऐकुन पळत आलेल्या पुतण्या दिपक गायकवाड यालाही गायकवाड यांनी गोळ्या घातल्या, त्यानंतर त्यांनी स्वता:ला संपवले. दरम्यान गोळीबारानंतर सुहास गायकवाड (Suhas Gaikwad) याने पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.तिघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.परंतू दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
पुणे पोलिसांचा वेगाने तपास सुरू
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची हत्या करत स्वता: आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना कोणत्या कारणातून घडली हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेच्या कारणांचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. या घटनेचा तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत. सदर घटना उघडकीस आल्याने बाणेर व पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.