Rahuri Advocate Murder News : आढाव दाम्पत्य हत्याकांड प्रकरणात राहुरी व अहमदनगर वकील संघटनेने केली मोठी मागणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Rahuri Advocate Murder News : राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव (Adv. Rajaram Adhav) आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव (Adv. Manisha Adhav) यांच्या हत्येसंदर्भातील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवावा अशी मोठी मागणी राहुरी तालुका वकील संघटनेने केली आहे.आढाव वकिल दाम्पत्य हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी दिवसभराच्या न्यायालयीन कामकाजावर राहुरी तालुका वकील संघटनेने आज बहिष्कार घातला आहे. तसेच अहमदनगर येथे जिल्हा न्यायालयात वकील संघटनेने निषेध सभा घेतली. (Rahuri Advocate news)
अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनने प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव व अॅडव्होकेट सौ. मनिषा आढाव यांची निघृण हत्या झाली, त्या बाबत निषेध सभा दिनांक २९/०१/२०२४ रोजी राहुरी येथील न्यायालयात झाली. सदर सभेस अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.
परिस्थितीचे गांभीर्य व शासनाने अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा या हेतुने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील कामकाजापासुन दिनांक ०३/०२/२०२४ पर्यंत सर्व वकीलांनी अलिप्त रहावे असा निर्णय घेणेत आला. त्यामुळे आजपासुन दिनांक ०३/०२/२०२४ पर्यंत न्यायालयातील कामकाजापसुन अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य वकील अलिप्त राहतील, असे म्हटले आहे.
राहुरी (rahuri news) न्यायालयातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव हत्याकांड प्रकरणात सराईत गुन्हेगारासह पाच जणांची नावे समोर आली आहे. सराईत गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग उर्फ दत्तात्रय (वय ३२, रा. उंबरे), सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे) या चौघांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बबन सुनिल मोरे (रा. उंबरे, सर्व रा. ता. राहुरी) या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, आरोपींचे वकीलपत्र कोणीच स्वीकारले नाही. (Ahmednagar Crime News)
आढाव आणि त्यांची पत्नीची पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या झाल्याचे समोर आहे. यासाठी आरोपींनी त्यांचे राहुरी (Rahuri) न्यायालयातून अपहरण केले होते.याप्रकरणी बेपत्ताची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. राहुरी आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास केल्यावर आढाव दाम्पत्यांच्या हत्येची उकल झाली. या हत्येत अटक करण्यात आलेला सराईत गुन्हेगार किरण दुशिंग याच्याविरोधात खून, जबरी चोरी,घरफोडी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सागर खांदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोडा, आर्म ऍ़क्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींचे वकीलपत्र कोणीच घेतले नाही. (rahuri crime news )
आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधासाठी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्यावतीने आज राहुरी वकील संघटनेने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी राहुरी तालुका वकील संघटनेने केली आहे. याशिवाय केंद्र सरकारने वकील संरक्षण कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसा ठराव राहुरी तालुका वकील संघटनेने मंजूर केला असून, तो महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनकडे पाठवला जाणार आहे. असे संघटनेकडून सांगण्यात आले.
राहुरी (Rahuri) आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांच्या बेपत्ता तक्रारीची दखल घेत तपास केला. राहुरी न्यायालय परिसरातील सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पोलिसांनी तपासले. याशिवाय आढाव वकील दाम्पत्याकडे कोण कोणत्या आरोपींचे वकीलपत्र होते, याची माहिती घेतली. यात मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार फिरत असल्याचे दिसले. या कारचा शोध घेतल्यावर ती रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण दुशिंग वापरत असल्याचे समोर आले. तसेच किरण दुशिंग याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे होते.
पोलिसांनी किरण दुशिंग याला ताब्यात घेत चौकशी केली. यावर त्याने साथीदारांच्या मदतीने कट करून आढाव वकील दाम्पत्याला खटल्याच्या कामकाजासाठी बोलावून घेतले. यानंतर दुशिंग याने स्वत:च्या गाडीत बसवून घेऊन आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरी घेऊन गेले. तेथे दोघांचे हात-पाय बांधून ठेवले. पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. परंतु आढाव दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यातून आरोपींनी आढाव यांचा त्यांच्याच घरामध्ये पाच ते सहा तास छळ केला.
यानंतर आढाव दाम्पत्याला कारमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन गेले. रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांना मारण्यात आले. आढाव दाम्पत्याचे मृतदेह उंबरे (umbare rahuri news) गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले. यानंतर वकील आढाव दाम्पत्याची कार राहुरी न्यायालय परिसरात लावली, अशी माहिती पोलिसांसमोर किरण दुशिंग याने दिली.
तक्रारदार लता राजेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचे, अपहरणाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे. किरण दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सागर खांदे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध दरोडा, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
राहुरी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आढावा दाम्पत्य खून प्रकरणाचा तातडीने छडा लावत चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई पार पाडली आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.