निवडणूक आयोगाविरोधात राज ठाकरे आक्रमक, शिक्षकांची बाजू घेत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल !

Raj Thackeray Full PC : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या शाळांमधील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता शिकवण्याऐवजी निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात (Teachers Election Duty) जुंपण्यावरुन मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, आयत्यावेळी शाळांवर दडपण का आणतात?,असा सवाल करत राज ठाकरे हे निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला.

Raj Thackeray Full PC live, Raj Thackeray is aggressive against Election Commission, taking side of teachers, Raj Thackeray gave harsh words to Election Commission,

निवडणूक आयोगाच्या कामात शिक्षकांना जुंपले जात असल्याच्या प्रकरणावरून राज ठाकरे हे आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले की, आतापासूनच निवडणूक आयोगाने शिक्षकांना रूजू व्हा असे सांगितले आहे, पुढील तीन महिने त्यांना शिक्षक हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो, तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

शिक्षकांना निवडणूकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांनी राज ठाकरेंकडे मांडली. यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. मुंबईतील 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढले आहेत, मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो? घाईगडबतीत सर्व काम करुन शाळेवर दडपण का आणत आहेत? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येत नाही. पाच वर्ष निवडणूक आयोग काय करत होतं. प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका येतात, मग तुमची यंत्रणा तयार नसते का? प्रत्येकवेळा नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा. शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवायला आले आहेत. पण यात विद्यार्थ्यांची चूक काय आहे. शिक्षकांनी कुठेही रुजू होऊ नये. विद्यार्थ्यांना घडवणं त्यांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं त्यांचं काम नाही. शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतेय. ते मला पाहयाचं आहे. लवकरच निवडणूक आयोगासोबत लवकरच बैठक होईल.

सोमवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीमुले राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतल्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर बोलणं टाळलं. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘निवडणुका आल्यावर याबाबत निर्णय घेऊ’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray Full PC : पाहा पत्रकार परिषद :