MLA Suhas kande | केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : राज्यसभा मतमोजणीचा मार्ग मोकळा पण शिवसेनेला मोठा धक्का
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीीर तब्बल आठ ते दहा तास नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. (RajyaSabha Breaking, Big decision of Central Election Commission: Rajya Sabha vote counting is open but)
राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान झाले.मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात तक्रारी केल्या, त्या तक्रारी पीठासीन अधिकाऱ्यांनी निकाली काढल्या, मात्र भाजपने महाविकास आघाडीचे तीन मते बाद करण्यात यावीत या मागणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते.
भाजप पाठोपाठ महाविकास आघाडीनेही भाजपचे दोन मते बाद करण्यात यावेत अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती, यामुळे मागील आठ ते दहा तासांत पासून महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली होती. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हाय वोल्टेज ड्रामा सुरु झाला होता.
अखेर आठ तासानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आता संपली आहे. या बैठकीचा निर्णय समोर आला असून शिवसेना आमदार सुहास कांदे (mla suhas kande news) यांचे मत रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला, थोड्याच वेळात राज्यसभेच्या मतमोजणी सुरुवात होणार आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड मंत्री यशोमती ठाकूर चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनीत राणा या चव्हाणचे मतदान वैध ठरवण्यात आले आहेत.
ANI ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने आरओ / निरीक्षक / विशेष निरीक्षकांच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर आणि व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर तपशीलवार आदेश पारित केला, आमदार सुहास कांदे यांनी दिलेले मत नाकारण्याचे आदेश आरओला दिले आणि मतमोजणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात निर्णय दिला या निर्णयानुसार महाराष्ट्रातील राज्यसभेच्या मतमोजणीस आता सुरुवात होणार आहे तासाभरात याचा निकाल अपेक्षित आहे निकालानंतरच कोणाच्या पारड्यात किती जागा जाणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यसभेच्या मतदानावेळी नेमकं काय घडलं होतं ?
राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमतीताई ठाकूर, तर शिवसेनेचे आमदार सुहास कायंदे अशा महा विकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेतला आहे,तिघांंची मते बाद करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली, मात्र पीठासीन अधिकारी यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. आमदार अमर राजूरकर यांच्या मते मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे आणि ॲड. अशिष शेलार यांना दिल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच आमदार रवी राणा यांच्या मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
संजय राऊत यांचा भाजप वर गंभीर आरोप
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? असा सवाल करत जिंकणार तर महा विकास आघाडीच.. जय महाराष्ट्र असे म्हणत राऊत यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. .