Ram Shinde Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांकडून सभापती राम शिंदे यांचे तोंडभरून कौतुक, आंतरवली सराटीच्या उपोषणस्थळी नेमकं काय घडलं ? आमदार धस व जरांगे पाटील यांच्यात नेमका काय संवाद झाला ? वाचा जसाच्या तसा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संघर्षयोध्दा मनोज (दादा) जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंतरवली सराटी येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी मोठी घडामोड घडली. जरांगे पाटील यांनी आज ३० रोजी आपले उपोषणाचे अंदोलन मागे घेतले. उपोषण मागे घेत असतानाच भाजपा आमदार सुरेश धस (suresh dhas) व खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत सविस्तर संवाद साधला.हा संवाद सुरू असताना विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे (ram shinde sabhapati) यांचा अचानक विषय निघाला. यावेळी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी प्रा राम शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.आंतरवली सराटी येथील उपोषणस्थळी नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून आंतरवली सराटी येथे उपोषणाचे अंदोलन हाती घेतले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांचे अंदोलन सुरू होते. आज ३० रोजी त्यांनी आपले उपोषण स्थगित केले. राज्य सरकारच्या वतीने भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे हेदेखील उपस्थित होते. यावेळी आमदार धस व जरांगे पाटील यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
धस व जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू असताना कर्जत-जामखेडचे भाग्य विधाते तथा विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा विषय निघाला होता.यावेळी आमदार धस व जरांगे पाटील यांच्यात नेमका काय संवाद झाला. वाचा जसाच्या तसा
- सुरेश धस : तुम्ही मधून आलतात जामगावला, चोंडीहून आलतात
- मनोज जरांगे पाटील : हो चोंडीहून आलतो
- सुरेश धस : चोंडीहून येताना पहिलं गाव माझं लागतं
- मनोज जरांगे पाटील : राम शिंदे साहेबांचं गाव आहे ना चोंडी
- सुरेश धस : हा चोंडी राम शिंदे साहेबाचं
- मनोज जरांगे पाटील : ते होते बघा त्यावेळेस दर्शनासाठी, चांगला माणूस त्यो,
- सुरेश धस : चांगला माणूसयं, तुम्ही चांगला माणूसयं म्हणल्यावर बाराशेवर आलयं (हातवारे आणि तोंडाची विशिष्ट कृती करत)
- मनोज जरांगे पाटील : नाय पण खऱ्यानेच चांगलेच आहेत ते, कारण ज्यावेळेस मी अहिल्यादेवींच्या दर्शनाला गेलो होतो त्यावेळी ते कंटिनिव्ह सोबत होते.
- सुरेश धस : तुमच्या कार्यक्रमाला हजर राहिला राव स्वता: दिवसभर
- मनोज जरांगे पाटील : नाही नाही आहे ते आहे, जाती फातीचा काय संबंधय, माणूस चांगलाय, खूप चांगलं पद मिळालं वाटतं त्यांना.
- सुरेश धस : चांगलं मिळालं, सर्वोच्च पद आहे ते आणि त्यांना संधी मिळाली. माणूस चांगलाय
- मनोज जरांगे पाटील : हो माणूस चांगलाय,
- सुरेश धस : तुम्ही ज्यावेळेस चोंडीला गेलते ना त्यावेळेस सकाळ ते संध्याकाळ तिथे होते.
- मनोज जरांगे पाटील : ते पडले ना वाटतं
- सुरेश धस : हो, बाराशे मताने, त्यांनी ओबीसी मराठा वाद होऊ नये म्हणून कोणाचीच सभा घेतली नाही, मला सभाच नको म्हणले कोणत्याच नेत्याची. माझं मी बघतो.
- मनोज जरांगे पाटील : सज्जन माणूस, राम शिंदे साहेबांचा स्वभाव सज्जन वाटतो.
- सुरेश धस : सज्जनचयं, फार काय कोणाच्या भानगडीत पडतं नाही, कोणाचं टेंशन नाही.. काही नाही.. नशिब चांगलयं..