Ram Shinde News : निसर्ग पर्यटन विकास योजनेंतर्गत कर्जत तालुक्यातील तीन देवस्थानसाठी 3 कोटी 24 लाखांचा निधी मंजुर – आमदार प्रा राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील प्रसिध्द रेहकुरी काळवीट अभयारण्य वन क्षेत्रातील तीन देवस्थान परिसराचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा याकरिता आमदार प्रा. राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सन २०२४ -२०२५ करिता निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास या राज्य योजनेतून वनविभागाने तीन देवस्थानसाठी ३ कोटी २४ लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर रोजी महसुल व वन विभागाने जारी केला आहे.

3 Crore 24 Lakh Fund Approved for Three Temples in Karjat Taluka Under Nature Tourism Development Scheme MLA Ram Shinde,

काळवीट व हरणांसाठी राज्यात प्रसिध्द असलेल्या रेहकुरी अभयारण्य क्षेत्रात तुकाईमाता मंदिर, वनदेव मंदिर व आप्पाबुवा मंदिर असे तीन जागृत देवस्थान आहेत.अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. या देवस्थानांचा विकास व्हावा अशी येथील ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती. याच मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी सदर देवस्थानचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा याकरिता शासन दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता.

3 Crore 24 Lakh Fund Approved for Three Temples in Karjat Taluka Under Nature Tourism Development Scheme MLA Ram Shinde,

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महायुती सरकारने सन २०२४ -२०२५ करिता निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास (२४०६ – २२९५) या राज्य योजनेतून कर्जत तालुक्यातील रेहकुरी काळवीट अभयारण्य परिसरातील तुकाईमाता मंदिर, वनदेव मंदिर व आप्पाबुवा मंदिर या देवस्थानचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी वनविभागाकडून सुमारे ३ कोटी २४ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसुल व वनविभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निधीतून सदर देवस्थान परिसराचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे.

महायुती सरकारने आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून रेहकुरी अभयारण्य क्षेत्रातील तुकाईमाता मंदिर, वनदेव मंदिर व आप्पाबुवा मंदिर या देवस्थानांचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा याकरिता भरिव निधी मंजुर केल्याबद्दल भाविक भक्तांसह कर्जत तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.