रेशनकार्ड संबंधित अपडेट मोबाईलवर मिळवण्यासाठी अशी करा online नोंदणी, जाणून घ्या सविस्तर https://nfso.gov.in/State/MH
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स आता एसएमएसद्वारेही मिळणार आहेत. ग्राहकसेवेत सुलभता आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. संबंधित ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. (Ration card related updates will be available on mobile, so register online)
‘वन नेशन, वन रेशन’ मोहिमेंतर्गत अन्न पुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहककेंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी संकेतस्थळ आणि मेरा रेशनकार्ड ॲपची ( mera restioncard app) निर्मिती करण्यात आली आहे.
मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क अभावी व शहरी भागातील काही ग्राहकांना इंटरनेट हाताळता येत नसल्याने ऑनलाइन माहिती मिळवणे त्रासदायक ठरत आहे. ही समस्या लक्षात घेऊन रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स एसएमएसद्वारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Register online to get ration card related updates on mobile)
- Satish Wagh Murder Case Pune : सतीश वाघ खून प्रकरणाचं धक्कादायक सत्य उघडकीस,पत्नीच निघाली मास्टर माईंड, मोहिनी वाघ हिला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Boxing Day Test Meaning : बाॅक्सिंग डे टेस्टची परंपरा कधी आणि कुठे सुरु झाली ? बॉक्सिंग डे टेस्टचा नेमका अर्थ काय ? जाणून घ्या सविस्तर
- Harshkumar Kshirsagar : क्लर्कचा पगार १३ हजार पण मैत्रिणीला दिला 4 BHK फ्लॅट, डायमंडचा चष्मा अन् 35 लाखांची BMW कार, हर्षकुमार क्षीरसागरच्या खतरनाक कारनाम्याने सगळेच हैराण, छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 कोटींच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड !
- ICC Champions Trophy 2025 Schedule : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने कधी ? जाणून घ्या
- Christmas 2024 : गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे सर्वधर्म समभाव जपण्याचे कार्य कौतुकास्पद- डाॅ शोभा आरोळे
त्यामुळे ज्या ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी संलग्न नसेल, त्यांनी तातडीने खालील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी असेल प्रक्रिया…
1) https://nfso.gov.in/State/MH या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2) तेथे ‘अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर असा पर्याय दिसेल. त्याखाली चार बॉक्स पाहायला मिळतील.
3) आधार कार्ड नंबर ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड/एनएफएस आयडी या पहिल्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
4) पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा.
5) तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव नमूद करून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका.
6) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल,