राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर, कोणत्या मंत्र्यावर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर !
मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात सातत्याने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रीमंडळात सहभाग घेतल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. परंतू त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्या आधीच सरकारने राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे.
१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे – अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार