Karjat Jamkhed MIDC: वातावरण तापलं ! भाजपा नेत्यांचा आमदार रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । “राष्ट्रवादीचे (NCP MLA) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आमदार प्रा.राम शिंदे ( MLA Ram Shinde) यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कर्जत-जामखेड मतदारसंघात उमटू लागले आहेत.रोहित पवारांविरोधात मतदारसंघात (Karjat Jamkhed) संतापाची लाट उसळली आहे.कर्जत आणि जामखेड तालुक्यातील भाजपचे नेते व कार्यकर्ते आमदार रोहित पवारांविरोधात आक्रमक झाले आहे. भाजप (Bjp) नेत्यांनी रोहित पवारांचा समाचार घेताना जोरदार टीकास्त्र सोडले आहे.” पाहूयात कोण काय म्हणाले ?
“आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी (Karjat Jamkhed MIDC) संदर्भात 24 जूलै 2023 रोजी मुंबईत (Mumbai) अंदोलन केले.या अंदोलनानंतर वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रोहित पवार यांनी एका प्रश्नांवर वादग्रस्त वक्तव्य केले. “मी जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय, तर तो अडवणूक करण्याचा प्रयत्न करतोय, अडवायचं तर, आडवून दाखवं, तुझ्याकडे आणि सरकारकडे बघतोच आता,” असे म्हणत रोहित पवार यांनी आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde News) आणि सरकार (Goverment) विरोधात अरेरावीची भाषा वापरली होती. याच वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज 25 रोजी कर्जत जामखेड मतदारसंघात उमटले. भाजपने रोहित पवारांविरोधात (Rohit Pawar MIDC News) आक्रमक पवित्रा घेत तीव्र निषेध नोंदवला. (Rohit Pawar controversial statement)“
वाचाळवीर रोहित पवारांच्या दादागिरीच्या भाषेला सडेतोड उत्तर देऊ – रविंद्र सुरवसे (Ravindra Suravse)
“विधानभवनामध्ये कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्याबद्दल खालच्या पातळीवर अरेतुरेची भाषा वापरून वाचाळवीर रोहित पवारांनी जी दादागिरीची भाषा वापरलीय त्या भाषेला कर्जत आणि जामखेड तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. गेल्या चार वर्षाच्या काळात कुठल्याही प्रकारच्या विकासाचं काम आमदार रोहित पवारांनी केलं नाही आणि आता येणाऱ्या काळात मी काही तरी करतोय असं दाखवण्यासाठी अंदोलनं करायचे उद्योग त्यांनी सुरु केले आहेत.खालच्या पातळीवर भाषा वापरणाऱ्या आमदार रोहित पवार यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे भाजपाचे विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे म्हणाले.”
जामखेडवाल्यांनी तुमच्याकडे बघितल्यावर तुमचं बारामतीला जाणं अवघड होईल- अजय काशिद
“आमदार प्रा.राम शिंदे साहेबांबद्दल आमदार रोहित पवार यांनी ज्या भाषेत त्यांचा उल्लेख केलाय ती दमदाटीची भाषा भारतीय जनता पार्टी कधीच खपवून घेणार नाही. मागच्या दोन महिन्या आगोदर बी शिंदे साहेबांना धमकी आली होती. रोहित पवारच्याच कार्यकर्त्याने ती धमकी दिली होती. अश्या दादागिरीचं वातावरण इथं कधी नव्हतं, पण आता होऊ लागलयं,” रोहित पवार म्हणतात बघतोच आता, “पण जामखेडवाल्यांनी तुमच्याकडे बघितल्यावर तुमचं बारामतीला जाणं अवघड होईल. त्यामुळे आपण आपल्या मर्यादेत राहून आपल्या भाषेचा व्यवस्थित वापर करावा. कोणाची भावना दुखावली गेली तर कोणी सहन करणार नाही.” यापुढे जर अशी काही हरकत झाली तर भारतीय जनता पार्टी कोणालाही सोडणार नाही. यापुढे आमचे नेते प्रा राम शिंदे साहेबांविरोधात बोलाल तर याद राखा, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद (Ajay Kashid) यांनी दिला आहे.”
पुन्हा जर अशी भाषा वापरली तर भाजपकडून जश्यास तसं उत्तर देऊ – भगवान मुरुमकर
“एमआयडीसीच्या मुद्द्याशी कर्जत-जामखेडची जनता सहमत आहे. आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत अंदोलन छेडलं होतं, या अंदोलनानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं, यात त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे साहेबांचा ऐकेरी उल्लेख केला. त्यांनी जी भाषा वापरली ती आदरणीय रोहित दादा पवारांना न शोभणारी भाषा आहे. आपले आजोबा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू आहेत. जामखेडची जनता काय आहे याचा अनुभव तुमच्या आजोबांना एकदा आलेला आहे.”
“ज्या वेळेस बाजारतळावर सभा होती त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांना जामखेडच्या जनतेनं कांदे आणि अंडे फेकून सभा भिरकावून लावली होती. सभा घेऊ दिली नाही. अशी जामखेडची जनता आहे. त्यामुळे आपण तोंडाच्या वायफट वल्गना करू नये.ह्यामध्ये कोणी कोणाला कमी नसतं, बघतो करतो ही जी भाषाशैली आहे ती आपण बदलावी. पुन्हा जर अशी भाषा वापरली तर भाजपकडून जश्यास तसं उत्तर दिलं जाईल. याची आपण खबरदारी घ्यावी.आदरणीय राम शिंदे साहेब गेली तीन टर्म आमदार आहेत. ते वयाने आपल्यापेक्षा सिनियर आहेत. त्यांच्यावर बोलताना भान ठेवून बोलावं, असे पंचायत समितीचे सदस्य भगवान मुरुमकर (Bhagwan Murumkar) म्हणाले.”
तर कर्जत-जामखेडची जनता बारामतीचे पार्सल पाठवून देईल – सभापती शरद कार्ले (Sharad Karle)
“महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार आमचे नेते राम शिंदे साहेबांविषयी रोहित पवारांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो, गेल्या तीन वर्षांत रोहित पवारांनी जामखेड MIDC चा प्रश्न एकदा सुध्दा विधानसभेत उपस्थित केला नाही. परंतू आता MIDC चा खरा पुळका ते दाखवत आहेत.आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्याच पाठपुराव्यामुळे कर्जत आणि जामखेड तालुक्यात MIDC होणार आहे.”
“महाराष्ट्रात पवार घराण्याचं खूप मोठं नाव आहे. पण रोहित पवारांनी जी दादागिरीची, अरेरावीची भाषा वापरली ती न शोभणारी गोष्ट आहे. रोहित पवारांची दादागिरी कर्जत-जामखेडची जनता कधीच सहन करणार नाही. येत्या काळात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहिल आणि बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला.”
कर्जत जामखेडमध्ये MIDC आणली तर ते फक्त राम शिंदे साहेबचं आणू शकतात – अंबादास पिसाळ
“भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे ते असंसदीय आहे. या कर्जत-जामखेडला हे मान्य होणार नाही. बघून घेऊ ही भाषा अत्यंत चुकीची आहे. राजकारणात अनेक पार्ट्या येतात, अनेक पार्ट्या जातात, अनेक सरकार येतात, अनेक सरकार जातात, पण त्याठिकाणी अशी भाषा कोणी काही वापरीत नाही, परंतू midc च्या विषयात ही भाषा वापरणे इतके काय योग्य नाही.”
“MIDC हा प्रकल्प कर्जत जामखेडच्या भवितव्याचा प्रकल्पय, अनेकवेळा राम शिंदे साहेबांनी तो प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे. शासनाच्या धोरणानुसार तो प्रकल्प उभा राहील. यात काही दुमत नाही. अनेक तरूणांना त्या ठिकाणी काम मिळेल. सरकार भारतीय जनता पार्टीचे आहे. Midc चा प्रश्न निश्चित मार्गी लागेल. कोणी काळजी करायचं कारण नाही, कोणी मी बघून घेतो याची भाषा करायची गरज नाही, कर्जत जामखेडमध्ये MIDC आणली तर ते फक्त राम शिंदे साहेबचं आणू शकतात, इतरांना ती येणार नाही. रोहित पवारांनी जी ऐकेरी भाषा वापरली त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहिर निषेध करतो. यापुढे अशी ऐकेरी भाषा कर्जत-जामखेडला चालणार नाही, यापुढे अशी भाषा वापरू नये, असा इशारा यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी दिला.”
रोहित पवारांनी स्टंटबाजी न करता सभागृहात मतदारसंघाचे प्रश्न मांडावेत – सचिन पोटरे
“आमचे नेते राम शिंदे साहेबांचा आमदार रोहित पवार यांनी ऐकेरी उल्लेख केला, त्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खरं पाहता मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन आणि सभागृहात संधी असते, पण रोहित पवारांनी सभागृहाच्या बाहेर स्टंटबाजीचे अंदोलन करून त्यांनी अधिवेशनातल्या आमदारांसह मंत्र्यांना वेठीस धरण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला. याशिवाय त्यांनी शिंदे साहेबांविषयी असंसदीय भाषा वापरली. यापुढे जर त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर तीव्र स्वरूपाचे अंदोलन हाती घेण्यात येईल. कार्यकर्त्यांना चेतावण्याची भाषा त्यांनी थांबवावी व कर्जत जामखेड मतदारसंघात लोकशाही नांदवावी, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले.”
शिंदे साहेबांनी तुमची MIDC कुठे आडवली हे दाखवा – काकासाहेब तापकीर
“आमदार रोहित पवार यांनी आमदार प्रा.राम शिंदे साहेबांबद्दल जे वक्तव्य केले ते अत्यंत निषेधार्य आहे. आमदार राम शिंदे साहेब MIDC विषयात आमदार राम शिंदे यांनी अडवणूक केल्याचे पत्र दिले असेल तर ते रोहित पवारांनी दाखवावं, शिंदे साहेब तुमची MIDC कुठं आडवायला गेले, कुठं काय केलं, हे खरं करून दाखवावा, मग राम शिंदे साहेबांच्या बाबतीत बोललं तर योग्य आहे. पण शिंदे साहेबांनी तुमची MIDC कुठेही आडवली नाही, त्याविषयावर ते कुठे बोलले नाहीत, त्यांचा कुठं शब्द नाही, तरी तुम्ही त्यांना अरेरावीची भाषा करता, अशी भाषा कर्जत तालुक्यात चालणार नाही, ती कधीच खपवून घेतली जाणार नाही, असे बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले.”