जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.(Rohit Pawar met BJP ministers in Delhi) या दौर्यात त्यांनी भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. रोहित पवारांनी भाजपा मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली दौऱ्यात रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman), सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार (Minister for Social Justice and Empowerment Dr. Virendra Kumar), अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Minority Affairs Minister Mukhtar Abbas Naqvi) सह आदींची भेट घेतली आहे.
आमदार रोहित पवार यांचा दिल्लीचा दौरा हा राजकीय दौरा नसल्याचे आता समोर आले आहे. रोहित पवार यांनी कर्जत – जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे आता समोर आले आहे.(Rohit Pawar met BJP ministers in Delhi)
आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे शहरी असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्याकडे केली तसेच मतदारसंघात बँकांचे जाळे कमी आहे. ते वाढवण्याचीही मागणी केली. (Rohit Pawar met BJP ministers in Delhi)
शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. (Rohit Pawar met BJP ministers in Delhi)
आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचीही भेट घेऊन अहमदनगर जिल्हा समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचीही पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली. याचसोबत अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची अहमदनगर जिल्हा आणि कर्जत – जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी विनंती केली. (Rohit Pawar met BJP ministers in Delhi)
आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. रोहित पवार यांची दिल्लीवारी चांगलीच चर्चेत आली आहे.