Sahil Nandedkar News । छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून समोर आली आहे. पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर (DCP Shilwant Nandedkar) यांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलले.राहत्या घरी गळफास घेत त्याने आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलं नाही. साहिल नांदेडकर (Sahil Nandedkar) असं आत्महत्या (Sucied) केलेल्या १७ वर्षीय युवकाचं नाव आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांचा साहिल नांदेडकर (वय १७) हा एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साहिलने शनिवारी रात्री आपल्या आई वडिलांसमवेत निवांत गप्पा मारल्या, अभ्यास कसा सुरू आहे. तसेच इतरही घडामोडींवर त्याने गप्पा मारल्या.त्यानंतर तो मध्यरात्री आपल्या खोलीत झोपण्यास गेला.
नेहमीप्रमाणे साहिलचे वडिल त्याला सकाळी उठवण्यास गेले असता साहिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. साहिलने उचललेल्या या टोकाच्या पावलामूळे नांदेडकर कुटूंब पुरतं हादरून गेलं. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, साहिल नांदेडकर याच्या बेडरूममधील ड्रेसिंग टेबलवरील आरश्यावर काही ओळी लिहिल्याचे आढळून आले आहे. त्यात लिहले आहे की, ‘आय वाॅन्ट टू रिस्टार्ट, आय डोन्ट क्विट, लव यू बोथ ! हे तीन वाक्य लिहले आहेत. या मजकुरामुळे साहिलच्या मृत्यूचे गुढ वाढले आहे. या प्रकरणाचा पोलिस वेगाने तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. (दि. 12 ऑक्टोबर) रोजी नांदेडकर कुटुंबीयांनी एकत्र दसरा साजरा केला. यावेळी साहिलही या उत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी तो आनंदीही होता. त्याने रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत अनेक गोष्टींवर गप्पा देखील मारल्या.
नेहमीप्रमाणे सकाळी उपायुक्त नांदेडकर हे 6 च्या सुमारास मॉनिंग वॉकला जाण्यासाठी उठले तेव्हा मुलगा उठला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाच्या रूमचे दार ठोठावले. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी 4-5 वेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला.
त्यांनी तात्काळ कुटुंबातील इतरांना हा घडलेला प्रकार कळवला. साहिलने आत्महत्या का केली असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत.
दरम्यान, साहिलने हे पाऊल उचलण्यापूर्वी आरशावर ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे आरशावर मार्करने लिहिले आहे. त्याने हे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील सर्वच अधिका-यांनी उपायुक्त नांदेडकर यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साहिल हा आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी करीत होता. तो अभ्यासातही अतिशय हुशार होता. मात्र, टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या नातेवाइकांसह संपूर्ण शहर पोलीस प्रशासनालाच धक्का बसला आहे.